उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि.31 मे पर्यंत

 

 

रायगड,(जिमाका):-दि.09:- सर्व उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा मानदे कायद्या नुसार त्यांच्या आस्थापनेत उत्पादित/आयात केलेल्या अन्नपदार्थांबाबत वार्षिक परतावा सादर करणे बंधनकारक असून उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि. 31 मे 2024 पर्यंत आहे. सर्व उत्पादक व आयातदार पेढयांनी आपला वार्षिक परतावा दि. 31 मे 2024 पर्यंत अगोदरच foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करावा. दि. 31 मे 2024 नंतर अन्न परतावा दाखल केल्यास प्रती दिन 100/- अशी दंडाची आकारणी करण्यात येते याची उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण नि.दि.मोहिते यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक