32-रायगड लोकसभा मतदारसंघात 60.51 टक्के मतदान मतदार याद्या परिपूर्ण असल्याने सुरळीत मतदान

 

 

रायगड (जिमाका)दि.08 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघात दि.7 मे रोजी 2024  रोजी सकाळी सात ते सायंकाळी  मतदान संपेपर्यंत एकूण 10 लाख 9 हजार 567  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  असून एकूण 60.51 टक्के मतदान झाले आहे, यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 334 तर महिला मतदार 5 लाख 9 हजार 233 असल्याची मााहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

32 रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार असून 8 लाख 47 हजार 763 महिला तर 8 लाख 20 हजार 605 पुरष आणि 4 तृतीयपंथीय मतदार आहेत.

विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे आहे,

191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 3 लाख 3 हजार 308 इतके मतदार असून 1 लाख 95 हजार 653 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1 लाख 2 हजार 255 पुरुष तर 93 हजार 398 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 97 हजार 396 मतदार असून त्यापैकी 1 लाख 98 हजार 289 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 1 लाख 629 पुरुष तर 97 हजार 660 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

193- श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 62 हजार 266 मतदार असून त्यापैकी 1 लाख 55 हजार 254 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 75 हजार 968 पुरुष तर 79 हजार 286 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 84 हजार 386 मतदार असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 696 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 83 हजार 416 पुरुष तर 80 हजार 280 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

263-दापोली विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 80 हजार 261 मतदार असून त्यापैकी 1 लाख 60 हजार 798 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 75 हजार 810 पुरुष तर 84 हजार 988 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

264-गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 40 हजार 755 मतदार असून त्यापैकी 1 लाख 35 हजार 877 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 62 हजार 256 पुरुष तर 73 हजार 621 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

32 रायगड लोकसभा मतदारसंघात कुठलाही अनूचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली.मतदारसंघातील सर्व मतदार आणि मतदान प्रक्रियेतील सर्व, अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आभार मानले आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक