राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची मतमोजणी केंद्राला भेट
रायगड दि.4(जिमाका):- जिल्ह्यातील 32-रायगड लोकसभा मतदारसंघासाठी दि.7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची व मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केली.
जिल्हा निवडणुक विभागाने केलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री.चोक्कलिंगम 32-रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी निवडणुक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक घेतली. मतदान प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था, मनुष्यबळ आदीबाबत माहिती घेऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याचा आढावा घेतला आहे.
32-रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि.4 जून रोजी होणार असून अलिबाग येथील नेहुली येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आदी उपस्थित होते.
00000000
.jpeg)
Comments
Post a Comment