केंद्रीय संचार ब्युरोमार्फत अलिबाग येथे मतदारांमध्ये जनजागृती पथनाट्यांना पर्यटकांचा जोरदार प्रतिसाद, मतदान करण्याची केली प्रतिज्ञा

 


 

रायगड,(जिमाका)दि.6:-लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोपुणे विभागीय कार्यालयामार्फत  स्थानिक जिल्हा प्रशासननेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास संघटना यांचे सहकार्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP) राबविण्यात आला.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळेप्रांताधिकारी मुकेश चव्हाणनायब तहसिलदार अजित तोलकर आणि अलिबाग येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक अजय वनारसेकेंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी सहायक पी. कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

अलिबाग हे कोकणातील लोकप्रिय असे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबईपुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी पर्यटक विरंगुळ्याचे क्षण घालवण्यासाठी दररोज दाखल होतात. विशेषतः शनिवाररविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी अलिबाग परिसर हा पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. या बाबी विचारात घेता पर्यटकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोमार्फत अलिबाग समुद्रकिनारा आणि अलिबाग बस स्टँड परिसर येथे शनिवार (4 मे) आणि रविवार (5 मे) असे दोन दिवस स्वीपसंदर्भात कार्यक्रम राबवण्यात आले.

यामध्ये पथनाट्य सादरीकरणसेल्फी स्टँड तसेच स्वीप प्रतिज्ञा यांच्यामार्फत मतदारांनी लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावायासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा उपयोग इतर कामांसाठी न करता आवर्जून मतदान करावेअसे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच मतदान यादीत नाव शोधणेमतदान यादीत नाव नोंदवणेदुरुस्ती तसेच पत्ता बदल करण्यासाठीची प्रक्रियायांबाबत पर्यटकांना मार्गदर्शनही करण्यात आले. मतदान हाच आपल्या ‘हातभर तक्रारींचा बोटभर उपाय’ आहेअसा संदेश यावेळी मतदारांना देण्यात आला.

याप्रसंगी रायगड येथील स्वयंमसिद्ध सामाजिक विकास संस्थेने सादर केलेल्या पथनाट्यांना पर्यटक आणि मतदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक