सोशल मिडीयावर रायगड पोलिसांची करडी नजर


 

रायगड,दि.5जिमाका -रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील पोलीस सायबर सेल आणि मिडीया सेल च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे.सोशल मिडीया (व्हॉट्सअॅप) वर लोकसभा 2024 च्या अनुषंगाने आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण करणारी ऑडीओ क्लिप व्हायरल करण्याऱ्या अज्ञात ईसमावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुक 2024 चे पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मिडीया मॉनेटरिंग करण्याकरीता सोशल मिडीया सेल स्थापन करण्यात आलेला असून त्याव्दारे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम व टियूटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे नेत्यांनी केलली भाषणे व त्या अनुषंगाने लोकांनी केलेली टीका टिप्पणी तसेच वॉट्सप ग्रुपवर लोकांनी व्हिडीओ,ऑडीओ व इतर प्रकारे केलेल्या पोस्ट या ऐकुन पाहुन व वाचन करून त्या मधील आक्षेपाहर्य पोस्ट मिळून आल्यास त्यावर योग्यती कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोशल मिडीया लॅबब्दारे मॉनिटरींग करण्यात येते. त्या अनुषंगाने दिनांक 4 मे रोजी सायं. 5 वाजण्याचे सुमारास सोशल मिडीया मॉनेटरिंग करीत असताना गोपनिय सुत्राकडून एक ऑडीओ क्लीप आढळून आली. या ऑडीओ क्लीप मध्ये  दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य असल्याचे आढळून आले.

सदर ऑडीओ क्लीप मधील आवाज विशिष्ट समाजाला भडकावुन सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणारे आहे. सदर अज्ञात इसमाविरूध्द सायबर पोलीस ठाणे गुरजि.नं.02/2024 भा.द.वि. कलम 505(2) सह लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरच्या गुन्हयाच्या तपास  पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे.

 सोशल मिडीयावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट करू नये, असे निर्देशनास आल्यास संबंधीत व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज