प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

             

रायगड,दि.09 (जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार पुरस्कार दिला जातो. त्यानुषंगाने बाल शक्ती पुरस्कार-2025 या वर्षासाठी दि.1 एप्रिल ते दि.31 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज (https://awards.gov.in) या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण फामगिरी केली आहे त्यांचे प्रस्ताव (https://awards.gov.in)  संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज