गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी
रायगड दि.16(जिमाका) :- गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वेलवली ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि.17 मे 2024 रोजी सकाळी 3.00 ते सकाळी 8.00 वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-सहाण बायपास मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-सहाण बायपास मार्गे नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत.
भारत सरकारच्या गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) चर्चा वाहतूक करण्याचे काम Total Movements Pvt. Ltd या कंपनीला मिळालेले आहे. सेलची लांबी 10.20. रूंदी 5.97 मिटर व उंची 5.52 मिटर व लांबी 7.70 मिटर, रुंदी 5.97 मिटर व उंची 5.63 मिटर आहे. अलिबाग ते रोहा रस्ता रा.प.म.91 किलोमीटर 2/200 ते 14/00 दरम्यान उसर येथील गेल कंपनीपर्यंत या सेलची वाहतुक ही दि.17 मे 2024 रोजी सकाळी 3.00 ते 8.00 वाजेपर्यतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासेल ची रूंदी व उंची जास्त असल्याकारणाने वाहतुकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता एम.एस.इ.बी. यांच्याकडून योग्य तो उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबतच पत्र Total Movements Pvt. Ltd. या कंपनीने प्राप्त करुन घेतले आहे.
ही वाहतूक करतेवेळी वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याने वाहन चालक व नागरीक यांना वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये म्हणून उपाय योजनेच्या दृष्टिकोनातुन ही वाहतूक दि.17 मे 2024 रोजी सकाळी 3.00 ते 8.00 वाजेपर्यतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
०००००००
Comments
Post a Comment