विविध कृषि पुरस्कार सन २०२३ साठी अर्ज करण्याचे आवाहन


        रायगड जिमाका दि.8-  महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-याकृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती/संस्था/गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारवसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारजिजामाता कृषिभूषण पुरस्कारसेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कारउद्यानपंडीत पुरस्कारवसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारयुवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत सन २०२३ या वर्षांमध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती / गट/ संस्था यांचे उपरोक्त प्रमाणे विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी / गट / संस्था / व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करणेबाबत आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्यरविंद्र बिनवडे यानी राज्यातील शेतकरी / व्यक्ती/गट / संस्था यांना आवाहन केले आहे. विविध कृषी पुरस्कार प्रदान तयार करणेकामी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज