जात वैधता प्रमाणपत्र देणेसाठी विशेष मोहिम

 

          रायगडदि. 0८ (जिमाका):- अनु. जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थीशासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचारीइ. अर्जदारांनी दि. ३० जून २०२४ पूर्वी समितीस दाखल केलेल्या अर्जांच्या बाबतीत ज्या अर्जदारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाहीअशा अर्जदारांसाठी त्रुटीपूर्तता शिबिर शुक्रवारदि. १२ जुलै रोजी स. ११.०० वा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय,  १४०२ अप्लॉट नं. ९स.नं. ७६/२बसेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल मागेचेंढरेअलिबाग-४०२२०१. येथे आयोजित करण्यात आले आहे.

             शैक्षणिक प्रयोजनार्थ सादर जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावांचे अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया नजीकच्या कालावधीत सुरु होत आहे. याकामी जात वैधता प्रमाणपत्र देणेबाबत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.उपरोक्त अर्जदारांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावाअसे आवाहन विशाल नाईक,उपायुक्त तथा सदस्य,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीरायगड  यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज