काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या मुलांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे आवाहन



रायगड,दि.09(जिमाका):- बालकांना काळजी व संरक्षणासाठी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, सीकेटी कॉलेज समोर, पनवेल, जि.रायगड येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले असून त्या मुलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) कु.गौरी जानू पवार, वय 08 वर्षे व कु.मधुरा जानू पवार वय 10  वर्षे 9 महिने, (दोन सख्ख्या बहिणी), 2) कु. शाबीर शेख, वय 09 वर्षे 10 महिने व कु.अब्दुल शेख वय 06 वर्षे 9 महिने, (दोन सख्खे भाऊ), 3) कु.प्रतिक धर्मा पाळमेळ, वय 9 वर्षे 10 महिने, 4) कु.सचिन मनोज गायकवाड वय 15 वर्षे 7 महिने  या सहा बालकांचे पालक व नातेवाईकांनी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत नामे संस्था बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, सीकेटी कॉलेज समोर, पनवेल, जि.रायगड 410206, मो.क्र.9823702297 वर संपर्क साधावा, अन्यथा बालकांची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून बाल कल्याण समिती, रायगड यांच्या मार्फत बालकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी कळविले आहे.

संपर्कासाठी पत्ता: बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, CKT कॉलेज समोर, पनवेल, जि. रायगड, मो.क्र. 9823702297, जिल्हा महिला व बालविकास विभाग, अलिबाग रायगड, संपर्क नंबर 7775018197.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज