वातावरणीय बदल आणि जैवविविधता आधारित पध्दतींबाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

रायगड(जिमाका)दि.30:- आगा खान एजन्सी फॉर हॅबीटेट, इंडिया ही संस्था वातावरणीय बदल आणि जैवविविधता आधारित पध्दतींबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्य करत आहे. या संस्थेमार्फत रायगड जिल्हयामध्ये Climate Change Adaptation-Coastal Restoration Programm अलिबाग आणि मुरुड तालुक्यात राबवित आहे. या कार्यक्रमाबाबत जिल्हा ते ग्रामस्तरावरील विविध विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता जनजागृतीसाठी  सोमवार,दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा ते दु.3.00 वा. पर्यंत जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्र.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी दिली आहे.

या कार्यशाळेस अलिबाग व मुरुड तालुक्यातील समुद्र व खाडी किनारी लगतच्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, संबंधित वन अधिकारी/कर्मचारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, कांदळवन कक्षातील अधिकारी/कर्मचारी, सहाय्यक आयुक्त, मत्स व्यवसाय अधिकारी, मच्छिमारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी/प्रतिनिधी, सागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक इ. अधिकारी/कर्मचारी व प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज