विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतिम मतदार यादी प्रसिध्द, जिल्ह्यात 20 हजार 668 मतदारांची वाढ
रायगड (जिमाका)दि.05:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 च्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार दि.29 ऑक्टोबर 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादी प्रसिध्दी नुसार जिल्ह्यात पुरुष 9 हजार 311, महिला 11 हजार 355 तर तृतीय पंथी 2 असे एकूण 20 हजार 668 मतदारांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
रायगड मतदार संघात एकूण 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 12 लाख 59 हजार 567 मतदार तर महिला 12 लाख 29 हजार 130 मतदार तर तृतीय पंथी 91 आहेत
188-पनवेल- पुरुष 3 लाख 46 हजार 402 मतदार तर महिला 3 लाख 5 हजार 586 मतदार तर तृतीय पंथी 74 असे एकूण 6 लाख 52 हजार 62 आहेत.
189-कर्जत- पुरुष 1 लाख 59 हजार 293 मतदार तर महिला 1 लाख 59 हजार 446 मतदार तर तृतीय पंथी 3 असे एकूण 3 लाख 18 हजार 742 आहेत.
190-उरण- पुरुष 1 लाख 71 हजार 526 मतदार तर महिला 1 लाख 70 हजार 563 मतदार तर तृतीय पंथी 12 असे एकूण 3 लाख 42 हजार 101 आहेत.
191-पेण- पुरुष 1 लाख 54 हजार 661 मतदार तर महिला 1 लाख 53 हजार 317 मतदार तर तृतीय पंथी 1 असे एकूण 3 लाख 7 हजार 979 आहेत.
192-अलिबाग- पुरुष 1 लाख 50 हजार 543 मतदार तर महिला 1 लाख 55 हजार 686 मतदार, तर तृतीय पंथी 1 असे एकूण 3 लाख 6 हजार 230 आहेत.
193-श्रीवर्धन- पुरुष 1 लाख 29 हजार 918 मतदार तर महिला 1 लाख 35 हजार 368 मतदार असे एकूण 2 लाख 65 हजार 286 आहेत.
194-महाड- पुरुष 1 लाख 47 हजार 224 मतदार तर महिला 1 लाख 49 हजार 164 मतदार असे एकूण 2 लाख 96 हजार 388 आहेत.
००००००
Comments
Post a Comment