विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज नागरिकांनी मताधिकार बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


रायगड,दि.18(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तरी  मतदारांनी  निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले.

अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक मतदान पूर्व तयारीबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकारांशी जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी निवडणूक पूर्वतयारीबाबत माहिती देताना, मतदार माहिती चिठ्ठीचे 98 टक्के वितरण झाले आहे असे सांगून मतदानासाठी ‘छायाचित्रासह मतदार ओळखपत्रासह’पर्यायी 12 पैकी कोणतेही एकओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र स्थापित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा ॲपद्वारेही ही माहिती मिळू शकेल. मतदारांना वितरीत करण्यात येणाऱ्या मतदार माहिती चिठ्ठीद्वारेदेखील कुठे मतदान करावयाचे आहे ते कळू शकेल.

बुधवार, दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.00  ते सायं.6.00 वाजेपर्यंत मतदान चालू राहणार आहे. तसेच शनिवार, दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये 24 लाख 88 हजार 788 इतके मतदार असून 2 हजार 820  मतदार केंद्र आहेत.  

जिल्ह्यातील मतदार संघामध्ये 13 हजार 191 दिव्यांग मतदार असून दिव्यांग मतदरांसाठी व्हीलचेअर व वाहनाची प्रत्येक मतदान केद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

   C-VIGIL : निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यापासून आजपर्यंत भारत निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारणावर जिल्ह्यात एकूण 50 तक्रारी दाखल झाल्या त्यापैकी 45 केसेस मध्ये वस्तुस्थिती आढळून आली आहे. 50 केसेसपैकी 45 केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत. तर 5 केसेस चुकीच्या पध्दतीने केलेल्या केसेस रद्द करण्यात आल्या.  तसेच टोल फ्री क्रमांक 1950 वर 69 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

वाहतुकीची सुविधा: विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरीता वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामध्ये एसटी बस 346, मिनी बस 124, जीप 291 अशा एकूण  761  वाहने ठेवण्यात आली आहेत. वाहनांकरीता GPS सुविधा : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार ईव्हीएम वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर GPS सुविधा उपलब्ध केली आहे.

जिल्ह्यात दि.16 नोव्हेंबर अखेर पर्यंत एकूण 2 हजार 680 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला:- 188-पनवेल विधानसभा  मतदारसंघ  85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 124 ज्येष्ठ नागरिकांनी, 13 दिव्यांग मतदार असे एकूण 137  मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.189-कर्जत विधानसभा  मतदारसंघ  85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 158 ज्येष्ठ नागरिकांनी, 17 दिव्यांग मतदार असे एकूण 175  मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 190-उरण विधानसभा  मतदारसंघ  85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 66 ज्येष्ठ नागरिकांनी, 16 दिव्यांग मतदार असे एकूण 82  मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.191-पेण विधानसभा  मतदारसंघ  85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 545 ज्येष्ठ नागरिकांनी, 58 दिव्यांग मतदार असे एकूण 603  मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.192-अलिबाग विधानसभा  मतदारसंघ  85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 442 ज्येष्ठ नागरिकांनी, 27 दिव्यांग मतदार असे एकूण 469  मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.193-श्रीवर्धन विधानसभा  मतदारसंघ  85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 423 ज्येष्ठ नागरिकांनी, 107 दिव्यांग मतदार असे एकूण 530 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.194-महाड विधानसभा  मतदारसंघ  85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 571 ज्येष्ठ नागरिकांनी, 113 दिव्यांग मतदार असे एकूण 684 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून 18 ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणाद्वारे 27 कोटी 43 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज