कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी पोलीस निवडणूक निरीक्षक यांच्या सूचना

 


रायगड (जिमाका)दि.6 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी रायगड जिल्ह्यातील  सातही मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रभावी पोलिसिंग करावे अशा सूचना  पोलीस निवडणूक निरीक्षक स्वप्नील ममगाई यांनी दिल्या.

रायगड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने निवडणूक तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह येथे संपन्न झाली.

या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, निवडणूक निरीक्षक संतोष कुमार राय, दुलीचंद राणा, सतीश कुमार एस, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, नवी मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रविकिरण कोले यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आगामी निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात पुरेसे मनुष्यबळ तैनात ठेवावे. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा. मतदान केंद्रावर जाताना व येताना पोलिंग पार्टी रवाना होतील तेव्हा त्यांच्याबरोबर पोलीस कर्मचारी देखील असावे. जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सर्व अंमलबजावणी संस्थानी त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य प्रामाणिकपणे बजावाव्या असेही श्री.ममगाई यांनी यावेळी स्पष्ट केले.   निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

बैठकीदरम्यान संवेदनशील मतदान केंद्राबाबत चर्चा करण्यात आली. निवडणुकीच्या पूर्वतयारीचे सर्व घटक तपासण्यात आले व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.  जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.घार्गे यांनी जिल्ह्यात पोलीस व्यवस्थेचा आढावा सादर केला.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक