निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न

 


रायगड (जिमाका)दि.05:- श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी  सामान्य निवडणूक निरीक्षक सतिश कुमार एस यांच्या उपस्थितीत मतदान यंत्राची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया  आज करण्यात आली.

यावेळी 194-महाड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे, 193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील  उपस्थित होते.

 निवडणूक निरीक्षक सतिश कुमार एस (सामान्य)यांनी उपस्थितांना श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि निःपक्षपातीपणे काम करावे अशा सूचना दिल्या. 

193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये 351 मतदान केंद्र असून याकरिता 421 बॅलेट यूनिट, 421 कंट्रोल युनिट तर 456 व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे.

194-महाड विधानसभा मतदारसंघामध्ये 393 मतदान केंद्र असून याकरिता 471 बॅलेट यूनिट, 471 कंट्रोल युनिट तर 510 व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज