दि.17 ते दि.30 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजना गतिमानात पंधरवड्याचे आयोजन
रायगड(जिमाका)दि.18:-उद्योग सहसंचालक, कोकण विभाग,ठाणे यांनी पंधरा दिवस दि. 17 ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवाडा घोषित केला आहे. हा पंधरवाडा यशस्वी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तालुक्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेची जनजागृती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळ्या यांनी दिली आहे
जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती मेळाव्यात प्रचार व प्रसिध्दी करुन पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कौशल्य उद्येाजकता विकास विभाग,आरसेटी, एमसीईडी, मिटकॉन, इ. संस्थे द्वारे उद्येाजकता विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या युवक/युवतीचे, जिल्ह्यातील औद्योगिक समुह विकास घटक, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) तसेच भौगोलिक मांनाकन प्राप्त उद्योजकांचे अर्ज प्राधान्याने या पंधरवाड्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
०००००
Comments
Post a Comment