सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

 


रायगड,(जिमाका) दि.18:- रायगड डाक विभागाने डाक जीवन विम्याचा क्लेम युद्धपातळीवर सेटल करून कै. सुयोग अशोक कांबळे हे इनफन्ट्री सोल्जर म्हणून कार्यरत असताना शहीद झालेल्या सैनिकास आदरांजली वाहिली. अतिशय कमीवेळात डाक जीवन विम्याचा क्लेम सेटल झाल्याने देशासाठी शहीद झालेल्या यांच्या कुटुंबासाठी हा रायगड डाक विभागाचा सुखद अनुभव होता. डाक जीवन विम्याचा रु 3,36,000/- क्लेमचा धनादेश वीरपत्नी निशा सुयोग कांबळे यांना सोपवण्यात आला.

याप्रसंगी रायगड डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक राकेश मिश्रा यांनी रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर यांच्या सामाजिक बांधिलकीला प्रधान्य देण्याच्या धोरणामुळे अशी कामे यशस्वीपणे मार्गी लावत सामाजिक ऋण चुकवता आल्याचा आनंद मोठा आहे असे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पोस्टमास्टर श्रीमती दर्शना सिंघासने, सैनिक कार्यालय अलिबागचे प्रतिनिधी, डाक सहाय्यक शुभम शर्मा हे उपस्थित होते. क्लेम सेटल करण्यासाठी पेण पोस्टमास्टर ज्योति बावकर, मनोज अंबुरे, देवेंद्र काते, एकता श्रीवास्तव यांनी मदत केली.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत