मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची दि.३० एप्रिल पर्यंत संधी उपलब्ध

 

 

रायगड-अलिबाग,दि.27(जिमाका):- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि ही प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य निर्यामत/कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली असून याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

 ज्या महिलांची -KYC करताना चुक झाली होती त्या महिलांनी दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत -KYC करुन घ्यावी, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही, दि.३० एप्रिल २०२६ पर्यंत -KYC नाही केली तरी सदरचा लाभ बंद होईल, असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन