जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
रायगड-अलिबाग,दि.27(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग आणि वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड, यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 एप्रिल 2026 रोजी वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड ता.महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी ,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.
रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत रावविण्यात येत असलेल्या कर्ज योजनां विषयाची माहिती दिली जाईल, जेणे करून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. तसेच रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.
संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.
०००००००
Comments
Post a Comment