जिल्हा युवा पुरस्कार:20 मार्च पर्यंत अर्ज करावेत


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवांनी पार पाडलेल्या भुमिका, दिलेले योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय समूह अशी ओळख समाजात झालेली आहे. युवांना मानव संसाधन विकासाचा मुख्यस्त्रोत म्हणून देखील मान्यता देण्यात आलेली आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे. वैश्विकरणाच्या युगात नवीन आव्हानांना तोंड देण्याकरिता युवांच्या सक्षमीकरणाची गरज आहे. त्याअनुषंगाने राज्याचे युवा धोरण -2012 मधिल शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले आहे. जिल्हयातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यास खाली नमुद विहित केलेल्या तरतूदीनुसार शासनाने मान्यता दिली आहे.
Ø  पुरस्काराचे स्वरुप 
जिल्हास्तर युवा पुरस्कार  जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम- रु. 10 हजार (प्रति युवक युवतींसाठी), प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम   रु. 50 हजार. अशा स्वरुपाचा असेल.
Ø  पात्रतेचे निकष
अ)   युवक युवतींसाठी पात्रता निकष 
अर्जदार युवक/युवतींचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षेपूर्ण 31 मार्च रोजी 35 वर्षेपर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्या जिल्हयात सलग 5 वर्ष वास्तव्य असावे.  पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती फोटो .) अर्जदार युवक युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठअंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
) संस्थांसाठी पात्रता निकष
पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती फोटो .)  अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थांचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार / संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
Ø  पुरस्कारासाठी मुल्यांकन
युवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल ते 31 मार्च याकालावधीतील गत तीन वर्षाची केलेली कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्याचे साधन संपत्ती जतन संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य. समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती जनजाती आदिवासी भाग . बाबतचे कार्य. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य. नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण . बाबत कार्य, साहस, . बाबतचे कार्य.
जिल्हा पुरस्कारासाठी अधिक माहिती लाभार्थींनी करावयाचा नमुना अर्ज प्रपत्र मध्ये विहित केलेला आहे. अर्जदारांनी तो नमुना अर्ज क्रीडा युवा संचालनालयाचे संकेतस्थळ http://sports.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.
रायगड जिल्हयात युवा कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व युवांनी / युवा संस्थांनी संपुर्ण माहितीसह युवा पुरस्कारासाठी अर्ज याकार्यालयाकडे दिनांक 20 मार्च 2018 पर्यंत सादर करावा तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक