ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.रविंद्र चव्हाण हे बुधवार दि. 14 रोजी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

बुधवार दि. 14 रोजी सकाळी सहा वा. शासकीय विश्रामगृह महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण. सकाळी साडे सहा वा. पाचाड किल्ले रायगड येथे आगमन. सकाळी सात वा. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन. सकाळी आठ वा. पाचाड किल्ले रायगड येथून अलिबागकडे प्रयाण. सकाळी 11 वा.  शासकीय वाहनाने अलिबाग येथे आगमन व रायगड जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामां संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ :- राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी एक वा. पत्रकारांशी वार्तालाप. दुपारी दीड ते अडीच राखीव. दुपारी तीन वा. अलिबाग येथून रेवदंडाकडे प्रयाण. दुपारी चार वा. रेवदंडा येथे आगमन व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी साडे चार वा. रेवदंडा येथून  शासकीय वाहनाने डोंबिवलीकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत