अवजड वाहतुकदारांनी नियमांचे पालन करावे- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांची अवजड वाहने ग्रामीण भागातून ये जा करीत असतात अशा वाहतुकदारांनी रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
            जिल्ह्यातील विविध अवजड वाहतूक करणारी वाहने  परिसरातील गावांमधून वाहतुक करतांना त्याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. यासंदर्भातील तक्रारींबाबत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित कंपन्यांचे अधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. याबैठकीस आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील उपस्थित होते. तसेच खारभुमी विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी.स्वामी, एस.ए. गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, वाहतुक पोलीस निरीक्षक एम.आर. म्हात्रे, पेण उपविभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, जेएसडब्ल्यू चे एम.बी. प्रसाद, मुकुंद नवंगाळ, एस.डी. निंबाळकर आदी उपस्थित होते.
            यावेळी आ. पंडीतशेट पाटील यांनी वाहतुकदारांमुळे  ग्रामीण भागात आणि अन्य रस्ते वाहतुकीला निर्माण होत असलेल्या अडथळे व अपघातांच्या धोक्याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, संबंधित वाहतुकदारांनी दिलेल्या निर्धारीत वेळेतच वाहतुक करावी, रिफ्लेक्टर्स बसवावे, वेगमर्यादेचे पालन करावे, प्रत्येक कंपनी व्यवस्थापनाने स्वतःचे टास्क फोर्स स्थापन करुन आपत्तीच्या प्रसंगी व्यवस्थापन करावे, जुनी कालबाह्य वाहने वापरातून बाद करावीत आदी सुचना दिल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत