सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती पात्र माजी सैनिकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावते

 

 

रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका):- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. याकरिता रायगड जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.), यांनी केले आहे.

 ही भरती प्रक्रिया टिसीएस आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावर (Resources Tab ---> Recruitment Tab) येथे दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून दि. 05 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल.

००००००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत