तटरक्षक दलाचा उपक्रम : अलिबाग, मुरुड, काशिद येथे शनिवारी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- आंतरराष्ट्रीय समुद्र तट स्वच्छता अभियानांतर्गत शनिवार दि.15 रोजी भारतीय तटरक्षक दलातर्फे  अलिबाग, काशिद आणि मुरुड येथील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.  स्वच्छ भारत अभियान राबविणे, समुद्र किनारे स्वच्छतेचे प्रात्यक्षिक देणे आणि किनारपट्टीवरील रहिवाशांमध्ये समुद्र किनारे स्वच्छते विषयी जागरुकता निर्माण करुन त्याचे सामाजिक आर्थिक फायदे समजावून सांगणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.15 रोजी सकाळी साडेसात वा. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर या मोहिमेचा प्रारंभ होईल. या अभियानात सहभागाचे आवाहन सहा. कमांडंट शुभ्रा घोष यांनी केले आहे.
00000

Comments