पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून शुभेच्छा

पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना
जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून शुभेच्छा

            अलिबाग दि.26, (जिमाका) राज्याचे स्वच्छता दूत जेष्ठ निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला पद्मश्री हा सन्मान पुरस्कार घोषित केला. त्यामुळे आज  रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले तसेच जिल्हा परिषद रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवंदडा येथे भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
                        यावेळी सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा धर्माधिकारी, श्रीमती नार्वेकर तसेच  अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, तहसिलदार (सामान्य) जयराज देशमुख, अजित नैराळे, अलिबाग तहसिलदार प्रकाश संकपाळ आदि अधिकारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान