महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 


अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत आज (दि.2 जून) रोजी अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीमध्ये महिला बचतगटातील महिलांचे HB, BP,ऑक्सिजन, व अँटीजन टेस्ट आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 50 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी CRP व प्रभाग समनव्यक गणेश म्हस्के उपस्थित होते.

शिबिरासाठी गट विकास अधिकारी यांनी विशेष प्रोत्साहन दिले. तसेच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती अलिबाग तालुका व्यवस्थापक श्रीमती शितल माळी यांनी दिली आहे.

०००००००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक