मतदानासाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी भर पगारी रजा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांचे आदेश

 

 

रायगड दि.05(जिमाका) :-32  रायगड लोकसभा मतदारसंघात क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या  प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी मंगळवार 7 मे  2024 रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

   जिल्हातील 32  रायगड लोकसभा मतदार संघात  तिस-या टप्प्यात मंगळवार 7 मे रोजी मतदान होणार आहे . या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना मंगळवार दिनांक 7 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती/अटीस अधिन राहून देय आहे. 1) सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे.  2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचा-यांसाठी लागू नाही. 3) सदर आदेशाचे पालन न करणा-या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब (2) नुसार कारवाईस पात्र राहतील. 4) सदरहू आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणा-या परंतु जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक