Posts

शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वी करावी --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

  वृत्त क्रमांक :- 23                                                                   दि.08 जानेवारी 2021   अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   राज्यात कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार आहे. त्या अगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम म्हणून सर्व शासकीय रुग्णालयांमधून ड्राय रन घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली पंचतन येथे भेट देऊन या ड्राय रन ची पाहणी केली. शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला आजपासून सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रन्टलाईन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला ...

जिल्ह्यात “माझी कन्या भाग्यश्री” योजनेची प्रभावी अंमलबजावणी 208 लाभार्थीं मुलींच्या खात्यात 52 लाख रुपयांचे अनुदान वर्ग

    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- राज्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजनेनुसार माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार एका मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या माता पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या खात्यात 50 हजार रुपये आणि दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या खात्यात प्रत्येकी 25 हजारांचे अनुदान वर्ग केले जात आहेत. रायगड जिल्ह्यात या योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुधारित “ माझी कन्या भाग्यश्री ” योजनेंतर्गत 208 लाभार्थीं मुलींच्या खात्यात 52 लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे या प्रमुख हेतूने माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना 2016-17 मध्य...

स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये प्रभावीपणे रुजायला हवा --जिल्हाधिकारी निधी चौधरी

    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- निसर्गाने स्त्री-पुरुष निर्माण केले, समाजव्यवस्था मात्र मानवाने निर्माण केली. यामध्ये स्त्री-पुरुष समानता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रभावीपणे रुजवायला हवी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निरी चौधरी यांनी आज येथे केले. “ बेटी बचाव,बेटी पढाव,बेटी बढाव ” या उपक्रमांतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, रेडिओलॉजिस्ट डॉ.सुहास ढेकणे, ॲड. नीला तुळपुळे, डॉ.ॲड. निहा अनिस, ॲड.नीता कोळी, ॲड. पल्लवी तुळपुळे, ॲड.वर्षा पाटील, डॉ.बसवराज लोहारे, डॉ.भास्कर जगताप, डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.भाग्यरेखा पाटील, डॉ.अंकिता मते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, महिला व बालविकास संरक्षण अधिकारी श्रीमती एस.एम.वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सरला काळे, पोलीस हवालदार नीलम नाईक, प्रिया चौलकर, सामाजि...

जिल्ह्यात करोना लसीकरणाचा ड्राय रन सुरु झाला हो…!

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   राज्यात कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार आहे. त्या अगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम म्हणून सर्व शासकीय रुग्णालयांमधून ड्राय रन घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातही अलिबाग जिल्हा रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. आज सकाळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या ड्राय रनची पाहणी केली. शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला आजपासून सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रन्टलाइन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.   जिल्हा प्रशासनाकडूनही लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य यंत्रणाही परिपूर्ण तयारीत आहे. रायगड जिल्ह्यासाठी 5लाख   लस दाखल होणार असून त्या प्राप्त झाल्याबरोबर जिल्ह्यात त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास ...

फिट इंडिया चळवळींतर्गत शाळांनी 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी--शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात

         अलिबाग,जि.रायगड,दि.07 (जिमाका):- मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र सरकारने फिट इंडिया चळवळ सुरू केली आहे. या चळवळी अंतर्गत राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळांनी दि.10 जानेवारीपर्यंत http:/schoolfitness.kheloindia.gov.in/static page/landing page.aapx या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.               फिट इंडिया चळवळीचा मुख्य उद्देश तंदुरुस्तीचे महत्त्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे, हा असून सन 2022 पर्यंत भारतीयांना तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प फिट इंडिया द्वारे करण्यात आला आहे. या चळवळी अंतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, आश्रमशाळा, विनाअनुदानित, अनुदानित शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे.  ...

विद्यार्थ्यांचे सन 2020-21 चे शिष्यवृतीचे नवीन अर्ज तर 2019-20 करिता नूतनीकरणासाठी अर्ज सादर करावेत सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे महाविद्यालयांना आवाहन

                 अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-   महाडिबीटी प्रणालीवर भारत सरकार शिष्यवृती  व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क या योजनेंतर्गत माहिती,अडचणीबाबत दि.04 जानेवारी 2021 रोजी येरला दंत महाविद्यालय, खारघर येथे  जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी उपस्थितांना सूचना दिल्या की, सर्व महाविद्यालयांनी सन 2020-21 करिता शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व सन 2019-20 करिता नूतनीकरणाचे अर्ज भरावेत.  त्याबाबत विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व पाठपुरावा करावा.  तसेच महाविद्यालय सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास त्रास होऊ नये, यासाठी महाविद्यालयांमार्फत बोनाफाईड तसेच मार्कशिट इत्यादी आवश्यक कागदपत्रे ही ई-मेल व घरपोच देण्यात याव्यात.             महाविद्यालयांनी सन 2011-12 ते 2017-18 या कालावधीतील प्र...

‘महात्मा गांधी स्मृती निलय’ बैठक मंत्रालयात संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-   महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या औचित्याने शिवाजीनगर, पुणे येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत उपलब्ध जागी ‘महात्मा गांधी स्मृती निलय’ या माहिती व वस्तू संग्रहालय स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मंजूर आहे. त्यानुषंगाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे उपस्थित होत्या.              यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, महात्मा गांधीजींच्या जीवनप्रवास आधुनिक माध्यमातून सर्वांना पहाता येईल, त्यासाठी पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरात स्थापन होणारे ‘महात्मा गांधी स्मृती निलय’ हे संग्रहालय येणाऱ्या पीढीला निश्चितच मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल. 2021 हे वर्ष महात्मा गांधी जयंतीचे 151 वे वर्ष असून या नियोजित संग्रहालयाच्या पुढील तांत्रिक बाबीं व निधी उपलब्धतेसाठी ग्रामविकास विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास तातडीन...