Posts

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत जनजागृती मोहिमेचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त "बालकामगार" या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत   विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.               दि.12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कामगार उप आयुक्त, रायगड-पनवेल कार्यालयामार्फत सध्याची करोना परिस्थिती लक्षात घेता ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             यानुषंगाने सर्व औद्योगिक संघटना असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रिडाई- बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय / निमशासकीय संस्था, नागरिक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करुन या मोहिमेत सहभाग नोंदवावा व रायगड जिल्हा बालकामगार मुक्त करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त, रायगड- पनवेल, श्री.प्र.मा...

खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू

                                                अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.   त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा व परिसर, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाळ/वरोसे धरण, वावर्ले धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, धामणी कातकरवाडी धरण, कलोते धरण या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रव...

कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू

                                                           अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.   त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता कर्जत तालुक्यातील आषाणे-कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण-पाझर तलाव, पळसदरी धरण, कोंढाणे धरण-धबधबा, पाली भूतिवली धरण, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा,आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झाले...

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शुक्रवार, दि.11 जून 2021 रोजी सायंकाळी 06.00 वा. ता.खेड, जि.रत्नागिरी येथून मोटारीने महाडकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : एम.एम.ए.कोविड सेंटर महाड. रात्रौ 8.00 वा. महाड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. ०००००० ०

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.00 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.60 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.30 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.20 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.30 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.40 मी. इतकी आहे. 00000

परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्तीकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून शासन निर्णय क्र. आदिशी-1203 / प्र.क्र.76/ का.12 दि. 31 मार्च 2005, दि.11 एप्रिल 2012 व दि.16 मार्च 2016 अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.       त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी दि.25 जून 2021 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.       अर्जाचा नमुना, योजनेच्या अटी व शर्ती या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण येथे संपर्क साधावा आणि अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण,जि.रायगड,कृषी उत्पन्न बाजार समिती, पहिला मजला,धरमतर रोड,रायगड बाजार जवळ,पेण,जि. रायगड, तसेच ई-मेल   poitdp.pen-mh@gov.in व दूरध्वनी क्रमांक 02143-252519 येथे   संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमत...

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून पनवेल तालुक्यातील "स्नेहकुंज" वृध्दाश्रमातील अपंग व जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

  अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हयामधील सर्व वृध्दाश्रम, आदिवासी, अपंग, अंथरुणात असलेले रुग्ण, अशा सर्वांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेशित केले होते.                   त्यानुषंगाने या लसीकरण मोहिमेस पनवेल तालुक्यामधून सुरुवात झाली असून दि. 09 जून रोजी "स्नेहकुंज आधारगृह" नेरे येथील 20 वयोवृध्द व अपंग नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.               ज्या नागरिकांकडे पुरावे नाहीत त्यांचे आधारकार्ड तयार करण्याचे कामही प्राधान्याने   सुरु करण्यात आले आहे.   लसींची उपलब्धता ज्या प्रमाणात होईल त्याप्रमाणे पनवेल तालुक्यामधील उर्वरीत 12 आश्रमातील सर्व लोकांचे लसीकरण सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून प्राधान्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार श्री.विजय तळेकर यांनी दिली आहे.    ...