Posts

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विषयक कार्यशाळा संपन्न

Image
अलिबाग,दि.25(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पुरवठा विषयक बाबींसंदर्भात रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंपधारक, एल.पी.जी. गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/मालक, ऑईल कंपन्यांचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी-कर्मचारी यांची आज दि.25 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये उप नियंत्रक, वैधमापन शास्त्र श्री.राम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभाग, रायगडचे सहाय्यक आयुक्त श्री.लक्ष्मण दराडे, भारत पेट्रोलियम गैस कंपनीचे मॅनेजर श्री.विशाल काबरा, आय.ओ.सी. कंपनीचे श्री.मणिकंदन मुरलीधरण यांनी मार्गदशन केले. तर रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.शेखर देशमुख, पेट्रोल पंप धारक श्री.बाळकृष्ण पाटील, शिवभोजन केंद्र चालक श्रीमती जेधे, रास्त भाव धान्य दुकानदार, सुधागड तालुका अध...

महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा, प्रादेशिक परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह, बाहगृह कर्जत येथील संस्थेत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

    अलिबाग,दि.25(जिमाका):- जिल्हा प्रादेशिक परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरिक्षण गृह, बालगृह कृषी उत्पन्न बाजार समिती आवार कर्जत मुरबाड रोड, एच. पी. पेट्रोल पंपाजवळ दहिवली, कर्जत या ठिकाणी खालील अ.क्र. 1 ते 7 पदे, बाल न्याय मंडळ कर्जत व बाल कल्याण समिती कर्जत येथे अ.न.8 ही सर्व पदे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरावयाचे आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. समुपदेशक-1 पद, मासिक मानधन रु.17 हजार 500, शैक्षणिक अर्हता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी, एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव - बालकांच्या क्षेत्रात कामकाज अनुभव असल्यास प्राधान्य.   परिवीक्षा अधिकारी- 1 पद, मासिक मानधन रु.17 हजार 500, शैक्षणिक अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (एम.एस.डब्ल्यू असल्यास प्राधान्य.) एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.  ...

आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू (विमोचन) साहित्य होमगार्ड संघटनेस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सुपूर्द

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- होमगार्ड संघटना ही मानसेवी संघटना ही मानसेवी स्वरुपाची असून पोलीस दलास सहाय्यकारी म्हणून कार्यरत आहे. आपत्कालीन स्थितीत स्थानिक प्रशासनाला मदत कार्यातही सहकार्य करते. त्या उद्देशाने मानसेवी होमगार्ड सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना मदत कार्यात सहभागी करून घेतले जाते. आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू (विमोचन) साहित्य होमगार्ड कार्यालयाकडे उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग होमगार्डना प्रशिक्षण देण्यासाठी करता येवू शकतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा समादेशक, गृहरक्षक दल तथा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड यांना हायबीम सर्च लाईट – 4, एल.ई.डी फ्लड लाईट विथ बॅटरी ऑपरेटर – 4, 8mm रोप, 10mm रोप, 12mm रोप (प्रत्येकी 100 मीटर), वॉकी टॉकी हॅण्ड सेट - 4, फर्स्ट एड बॉक्स - 5, तंबू - 5, मेगा फोन - 2, चेन सॉ/वूड कटर – 2 हे साहित्य आज दि.24 मार्च 2022 रोजी उपलब्ध करुन देण्यात आले. साहित्य वाटप कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा समादेशक...

शासकीय अर्थसहाय्याचा लाभ घेण्याकरीता पात्र कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तर कला संस्थांनी सांस्कृतिक संचालनालयाकडे तात्काळ अर्ज करावेत -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

अलिबाग,दि.24(जिमाका):- प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार / संस्था यांना कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. प्रति लाभार्थी (एकल कलाकार) रु.5 हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यास्तव प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंत यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांच्याकडे तर समूह / फड / पथक यांनी त्यांच्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, एम.जी.रोड, मुंबई- 400032/ सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, पहिला मजला, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे 411006 यांच्याकडे दि.23 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.गजानन लेंडी यांनी केले आहे. संबंधित योजनेच्या दोन्ही अर्जांचे नमुने, या योजनेकरीता पात्रता, निकष,...

श्रीवर्धन पर्यटन महोत्सव 2022; पर्यटन महोत्सवातून सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- श्रीवर्धनला अतिशय सुंदर असा समुद्र किनारा लाभला असून हा समुद्र किनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक श्रीवर्धन बीचला भेट देत असतात. ही बाब लक्षात घेवून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने या वर्षी श्रीवर्धन पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई आणि “ श्रीवर्धन पर्यटन संस्था-श्रीवर्धन ” यांच्या संयुक्त विद्यमाने “ श्रीवर्धन पर्यटन महोत्सव – 2022 ” आयोजित करण्यात आला आहे. दि.26 व 27 मार्च 2022 रोजी “ श्रीवर्धन बीच ” येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, या पर्यटन महोत्सवात सर्व पर्यटक व नागरिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. दि.26 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री पर्यटन तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे रायगड यांच्या हस्ते होणार असून, या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दि.26 मार्च रोजी वाळूशिल्प प्रदर्शन, कोकण खाद्य संस्कृती स्टॉल, गिधाड संवर्धन, सर्प म...

छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेण्यासाठी सरसावल्या बचतगटाच्या महिला

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ, रायगड तसेच युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने दि.21 मार्च 2022 रोजी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेतील ज्या महिलांचे कोरोना कालावधीत उद्योग व्यवसाय बंद झाले किंवा ज्यांना नव्याने घरगुती व्यवसाय चालू करणे आहे किंवा टेलरिंग येते पण मशीन घेऊ शकत नाही अशा एकूण 94 महिलांना नुकतेच त्यांना छोट्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेता यावी यासाठी वस्तू रुपात साहित्य वाटप करण्यात आले. त्यातील 47 महिलांना शिलाई मशीन, 20 महिलांना घरघंटी, 12 महिलांना ब्युटी पार्लर किट, 1 महिलांना केक तयार करण्याचे किट तसेच 14 महिलांना फूड सर्व्हिसचे किट असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्याकडून ही या महिला बचतगटातील महिलांचा पाठपुरावा करण्यात येईल. जेणेकरून या किट किंवा या मदतीमुळे त्यांना कसा फायदा झाला किंवा होत आहे हे माहीत करून घेतला जाईल, असे सांगण्यात आले. या किट वाटप कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गावडे, सहायक आयुक्त श्री.विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ...

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा शाखेकडून पुरवठाविषयक बाबींसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन

अलिबाग,दि.23(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पुरवठाविषयक बाबींसंदर्भात रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंपधारक, एल.पी.जी. गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/ मालक, ऑईल कंपन्याचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळा शुक्रवार, दि.25 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना, सुधारीत ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील सुधारणा, ग्राहकांचे हित जोपासण्याच्या अनुषंगाने आवश्यक बदल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच भारत सरकारची डिजिटल इंडिया ही महत्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश नागरिकांना सर्व शासकीय सुविधा या इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (Online) उपलब्ध करुन देणे हा आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ तसेच पुरवठा...