Posts

म्हसळा नगरपंचायत क्षेत्रातील सर्व्हे नं. 17/1 जमिनीमधील क्षेत्राचा मसणवटा म्हणून असलेला वापर बंद करण्याचे आदेश जारी

अलिबाग, दि.10 (जिमाका):- जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतकडील सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 20, दि.10 मार्च 2022 नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965, मधील कलम 253 मधील, पोटकलम (1) अन्वये प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि.31 मे 2022 पासून जिल्ह्यातील म्हसळा गावातील सर्व्हे नं. 17/1 जमिनीच्या 0-96-40 हेक्टर आर. क्षेत्रापैकी सावर रस्त्यासाठी वापरात असलेले माणगाव-म्हसळा रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र 0-13-50 हेक्टर आर.(अंदाजित), स्मशानभूमीसाठी वापरात असलेले माणगाव म्हसळा रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र 0-13-50 हे.आर.(अंदाजित), अतिक्रमित क्षेत्र 0-06-00 हे.आर. असे एकूण 0-53-00 हे.आर वापरात असलेले क्षेत्र वगळून उर्वरीत 0-43-40 हे.आर क्षेत्राचा मसणवटा म्हणून असलेला वापर बंद करण्यात येत आहे. तरी नमूद 0-43-40 हे.आर क्षेत्रात जो कोणी कोणतेही प्रेत पुरील किंवा त्याची अन्यथा विल्हेवाट लावील त्यास, अपराध सिद्ध झाल्यानंतर 02 हजार 500 रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होईल, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे. 00000

तळीये पुनर्वसन कामाच्या पाहणी दौऱ्यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

Image
दरडग्रस्त तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर  वृक्ष व बांबू लागवड  करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प   अलिबाग, दि.10 (जिमाका):-  गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांनी दि.08 जून 2022 रोजी तळीये येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दरडग्रस्तांसाठी सुरू असलेल्या पुनर्वसन कामाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्तेही वृक्षारोपण संपन्न झाले. जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरडग्रस्त तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष व बांबू लागवड करण्याचा संकल्प केला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्या अहवालात दरडप्रवण क्षेत्रात भू:स्स्खलन आणि दरड पडण्याचा धोका कमी करण्याकरिता रायगड जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. सन 2022 मध्ये रायगड जिल्हा परिषदेद्वारे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम...

जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

अलिबाग, दि.10 (जिमाका):- मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशा न्वये नमूद केलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खोपोली , अलिबाग , महाड , माथेरान , मुरूड जंजिरा , पेण , रोहा , श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारण्यासाठी संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खालीलप्रमाणे आरक्षण सोडतीचे ठिकाण , वेळ तसेच आरक्षण व सोडतीवरील हरकती स्विकारण्याचे ठिकाण , वेळ निश्चित करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे नाव: खोपोली, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडती...

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषी विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

अलिबाग, दि.09 (जिमाका):-  खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते याबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास या नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत,...

जिल्हा अग्रणी बँकेद्वारा आयोजित “ग्राहक जनसंपर्क अभियान” कार्यक्रम उत्साहात संपन्न

अलिबाग, दि.09 (जिमाका):-  वित्तिय सेवा विभाग, भारत सरकार, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडिया लीड डिस्ट्रिक्ट बँक, रायगड यांच्या सहकार्याने हॉटेल होरिजन, खडताळ ब्रिज, अलिबाग-रेवस रोड, वरसोली, अलिबाग येथे काल (दि.08 जून 2022) रोजी  “ ग्राहक जनसंपर्क अभियान ”  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश समाजातील ग्राहकांना बँकेच्या सेवांबद्दल मार्गदर्शन व उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, त्यांची माहिती समाजात देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविणे, त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ लोकांकर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे, लोकाभिमुख योजनांचा प्रसार आणि मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन करणे हा होता. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती शंपा बिस्वास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) श्री.प्रदीप अपसूंदे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (MSRLM) चे जिल्हा व्यवस्थापक श्री.सिद्धेश राऊळ, उपविभागीय जिल्हा क...

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

               अलिबाग, दि.09 (जिमाका):- राज्यातील बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वच स्तरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून राज्यात प्रथम क्रमांक पटकविण्याची परंपरा कोकण विभागाने कायम ठेवली आहे. यंदाही (97.21 टक्के) उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये राज्यात अव्वल स्थान मिळविले. मुंबई विभागातील रायगड जिल्हा (93.11 टक्के) निकालाने पहिल्या क्रमांकावर असून त्यात 94.72 टक्के मुली परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. बोर्डाची गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छांसह त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी ज्या सचोटीने अभ्यास केला त्याचप्रमाणे करिअर निवडताना योग्य ती काळजी घ्यावी, विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सूचक सल्ला जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यंदाच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या. कोरोनामुळे कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित न राहता थेट परीक्षा व त्यात घवघवीत यश संपादन केलेल्या राज्यातील सर्व गुणवंत, यशस्वी विद्यार्थ्यांचे क्रीडा व यु...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC पूर्ण करण्यास दि.31 जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ

  अलिबाग, दि.09 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची ई-के.वाय.सी. (e-KYC) करण्याबाबतचे उपायुक्त (कृषी गणना) तथा पथक प्रमुख पी.एम.किसान कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्राच्या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची ई-के.वाय.सी. (e-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे. तरी या योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ई-के.वाय.सी. ( e-KYC ) पूर्ण करण्यास दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-के.वाय.सी. (e-KYC) पूर्ण करावी, असे आवाहन अलिबाग तहसिलदार तथा नोडल अधिकारी श्रीमती मीनल दळवी यांनी केले आहे. 00000