Posts

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत— पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

    अलिबाग,दि.29 (जिमाका):- विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत इच्छुकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केल...

गोवर रुबेला लसीकरण विशेष मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे

    अलिबाग,दि.29 (जिमाका) :- जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गोवर रुबेला लसीकरणासाठी दि.15 ते 25 डिसेंबर 2022 आणि दि.15 ते दि.25 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेत आरोग्य विभागाकडून दि.26 जानेवारी 2023 पर्यंत सर्व लाभार्थी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पथके कार्यरत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली आहे. या मोहिमेत 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील डोस देण्याचे राहिलेल्या मुलांना घरोघरी सर्वेक्षण करून नजिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.   यामध्ये शिल्लक राहिलेला पहिला किवा दुसरा डोस देण्यात येणार आहे.   त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पूर्व तयारी करण्यात आली आहे.   तसेच जिल्ह्यात 74 विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.   त्याचप्रमाणे नियमित 1 हजार 760 लसीकरण सत्रामध्ये गोवर लसीकरण केले जाईल. या सर्वेक्षणात जिल्ह्यात आरोग्य वि...

जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सचिवालय कक्ष” स्थापन जिल्ह्यातील नागरिकांनी शासनस्तरावर प्रलंबित कामाविषयी अर्ज, निवेदने सादर करावीत --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

      अलिबाग,दि.29 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य   जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्यानुषंगाने मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून दिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यासाठी माहे जानेवारी 2020 पासून विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात होणारे अर्ज निवेदन इत्यादीवर कार्यवाही करण्यात येणार आहे. या कार्यवाहीमध्ये अधिकाधिक, प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटार होण्यासाठी शासन महसूल व वन विभागाकडील दि.16 डिसेंबर 2022 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.   तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या कामाविषयी त्यांचे अर्ज, निवेदने जिल्हाधिकारी क...

रायगड जिल्हा परिषद येथे स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

      अलिबाग,दि.29 (जिमाका) :- जिल्हा परिषद रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापिका झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, स्वदेस उपसंचालक तुषार इनामदार यांच्या हस्ते स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. स्वदेस फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी स्वदेस श्रेष्ठ शाळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये 126 प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. सहभागी शाळांचे मूल्यांकन शाळा सिद्धी व स्वदेस ध्येयांच्या   धर्तीवर करण्यात आले होते. यानुसार अंतिम फेरीमध्ये 26 शाळा पोहोचल्या होत्या, यांचे मूल्यावर शिक्षण तज्ञांकडून करण्यात आले होते. प्राथमिक शाळेमध्ये माणगाव तालुक्यातील रानवडेकोंड व माध्यमिक शाळेमध्ये तळा तालुक्यातील अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला....! श्रेष्ठ शाळा पुरस्कार पुरस्कार प्राप्त व सहभागी शाळा- प्राथमिक शाळा विभाग- रायगड जिल्हा परिषद शाळा...

शालेय विद्यार्थ्यांसाठी “सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन” विषयावर आरसीएफ विद्यालय येथे कार्यशाळा संपन्न

                       अलिबाग,दि.29 (जिमाका) :- वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग तालुक्यात वन्यजीव विशेषत: साप, पक्षी, सस्तन प्राणी यांचा बचाव तसेच औषधोपचर करण्याचे सेवाभावी कार्य करीत आहे. रायगड वनविभागाच्या सहकार्याने वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग या संस्‍थेतर्फे (शनिवार, दि. 17 डिसेंबर 2022) रोजी आरसीएफ विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी “ सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन ” या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत डॉ.प्रसाद दाभोळकर, ओमकार कामतेकर, अदिती सगर, सुजित लाड आणि समीर पालकर यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना सापांबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.     परिसरात साप आढळून आल्यास त्याला मारु नये, काय करावे तसेच सर्पदंश झाल्यास कोणती काळजी घ्यावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. ०००००००

मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

      अलिबाग, दि.29 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून 2023 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जानेवारी-2023 : बुधवार, दि.11 जानेवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.10 जानेवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.6 जानेवारी व शुक्रवार, दि.27 जानेवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.9 जानेवारी व सोमवार दि.16 जानेवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.17 जानेवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.18 जानेवारी 2023, ता.माणगाव. माहे फेब्रुवारी-2023 : बुधवार, दि.15 फेब्रुवारी 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 फेब्रुवारी 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 फेब्रुवारी व शुक्रवार, दि.24 फेब्रुवारी 2023 ता.अलिबाग, सोमवार, दि.13 फेब्रुवारी व सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 ता.महाड, मंगळवार, दि.21 फेब्रुवारी 2023 ता.श्रीवर्धन, बुधवार, दि.22 फेब्रुवारी 2023, ता.माणगाव. माहे मार्च-2023 : बुधवार, दि.15 मार्च 2023, ता.रोहा, मंगळवार, दि.14 मार्च 2023, ता.मुरुड, शुक्रवार, दि.10 मार्च व श...

अलिबाग तालुक्यातील को.ए.सो च्या ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाडने दिल्लीत उंचावली महाराष्ट्राची मान ना.ना पाटील हायस्कूलच्या एन.सी.सी.कॅडेट्स ची प्रजासत्ताक दिनाच्या राजपथवरील परेडसाठी निवड... हा बहुमान मिळविणारे रायगडमधील पहिले विद्यालय

  अलिबाग,दि.29 (जिमाका):- दिल्लीत दि.26 जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हावे, असे अनेक कॅडेट्सचे स्वप्न असते. एन.सी.सी.मध्ये “ रिपब्लिकन डे परेड अर्थात आर.डी परेड ” ही अत्यंत मानाची समजली जाते. या आर.डी.परेडसाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील को.ए.सो.ना.ना.पाटील हायस्कूल मधील सार्जंट जय महेश पाटील व कॅडेट गौरव दत्तेश डिंगणकर या दोन कॅडेट्सची निवड झाली आहे.    या कॅडेट्सने औरंगाबाद येथे झालेल्या “ एक भारत श्रेष्ठ भारत ” या देशपातळीवरील शिबिरामध्ये सांस्कृतिक सादरीकरणामध्ये सूवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर त्यांना पुणे येथे होणाऱ्या आर.डी.परेड पूर्वतयारी शिबिर निवड प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले.   त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 116 कॅडेट्सची निवड करण्यात आली. यात ज्युनिअर डिव्हिजनच्या 35 कॅडेट्सची निवड   झाली असून   त्यातील दोन कॅडेट्स रायगड जिल्ह्याचे आहेत.     या कॅडेट्सना शाळेचे अधिकारी श्री. समाधान शिवाजी भंडारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच 6-महाराष्ट्र बटालियनचे कमांडं...