Posts

“महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम” (भाग-1)

    आरोग्य सेवांचा मूळ उद्देश आरोग्य सुधारणे हा असून, लोकांचे जीवनमान सुधारावे व निरोगीपणे जगता यावे यासाठी, आरोग्य शिक्षण व सेवा यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्य क्षेत्र, यात प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचाही समावेश होतो. या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यात येते. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या वतीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. या आरोग्य सेवा अधिकाधिक लोकाभिमुख झाल्यास लोकांना चांगले आरोग्य लाभून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. सामाजिक क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्था व खाजगी क्षेत्र या माध्यमातून अंगीकृत रुग्णालयातून आपल्या सेवा या देत असतात, त्या सेवांशीही शासन सामाजिक आरोग्य क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने विविध महाआरोग्य योजना सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीने साकारलेल्या आहेत.  या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन लोकांनी...

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर

  अलिबाग, दि.2 (जिमाका) : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.     विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी दि. 30 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पालघर चे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपायुक्त मनोज रानडे आदी उपस्थित होते. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण 99 मतपेट्या मध्ये मतपत्रिका होत्या. मतमोजणी साठी एकूण 28 टेबले ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण ...

महाराष्ट्र शासनाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याच्या कालावधीस मुदतवाढ

  अलिबाग,दि.2(जिमाका):- मराठी भाषेतील उत्कृष्ट बाय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वा पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका पूर्वीच्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 01 जानेवारी ते दि.31 जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार होत्या. तथापि, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात येत असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 02 मार्च 2023 हा राहील. दि. 01 जानेवारी 2022 ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल...

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची तयारी सुरू 7 कोटी 61 लाख‌ रुपये खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार 1 हजार 328 गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश

    अलिबाग,दि.2(जिमाका) :- रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी 7 कोटी 61 लाख 58 हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करुन मंजूरीसाठी वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात 1 हजार 328 गावे व वड्यांवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीर दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्...

रायगड जिल्हा कृषी महोत्सव-2023 कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी भेट द्यावी --जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले

  अलिबाग,दि.2(जिमाका):- दि.09 फेब्रुवारी ते दि.13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये सेक्टर 27, सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या रायगड जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023, शासनाच्या विविध कृषी योजना/उपक्रमांची माहिती, कृषी तंत्रज्ञान, नाविण्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रात्याक्षिके, कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी/उद्योजकांची व्याखाने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य, कडधान्ये व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रायगड जिल्हा कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे. ०००००००

पनवेल येथे व्यवसाय सुलभीकरण कार्यशाळा संपन्न

    अलिबाग,दि.2(जिमाका):- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पनवेल येथे व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business) एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, पनवेल सहकारी औद्योगिक वसाहत पनवेल श्री.विजयकुमार लोखंडे, EODB श्री.सरीम खान, MAITRI श्रीमती अमषा शेट्टी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ श्री.व्ही.व्ही.किल्लेदार,   सहाय्यक आयुक्त कामगार श्री.समीर चव्हाण,   महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ श्री. ठाकूर इत्यादी सह जिल्ह्यातील सुमारे 60 ते 70 उद्योजक उपस्थित होते. महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यात 200 पेक्षा जास्त मोठे व विशाल उद्योग असून 12 हजार पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु व मध्यम उत्पादन उद्योग   कार्यरत असून 8 ते 9 महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ क्षेत्रे 3 सहकारी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. रायगड जिल्हा औद्योगिकदृष्टया महाराष्ट्रातील एक मोठा जिल्हा असून जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूकीकरिता मोठा वाव आहे.   तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आजपर्...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

    अलिबाग,दि.2(जिमाका):- शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान केले जातात. पूर्वी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास दि.16 जानेवारी ते दि.30 जानेवारी 2023 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया व इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर व स्पर्धा यासाठी अर्ज करण्यास पुरेशा कालावधी न मिळाल्याने पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्यातील विविध क्रीडा संघटना व खेळाडूंनी शासनास विनंती केली होती. त्यानुसार शासनाने विनंतीचा व वस्तुस्थितीचा सर्वकष विचार करुन दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत का...