Posts

धेंरड-शहापूर येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-पालकमंत्री उदय सामंत

Image
    रायगड,दि.16(जिमाका):- अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील एमआयडीसीच्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहेत,त्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित धेरंड-शहापूर भूसंपादनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे आदिंसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.     पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला पाहिजे,ही भूमिका एमआयडीसीने घेतली आहे.  पहिला हा भाव रु.35 लाख होता, दुसरा भाव रु.50 लाख, तिसरा रु.60 लाख आता यामध्ये वाढ करुन तो रु.70 लाखापर्यंत नेला आहे. अजूनही यामध्ये कॅल्यूलेशन करुन काही वाढीव देता आले तर त्यासाठीही प्रयत्न केले जातील.  या प्रकल्पामुळे सहा गावे प्रकल्पबाधित होणार आहेत. या प्रकल्पाबा...

शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे- पालकमंत्री उदय सामंत

Image
    सर्व विभागानी काटेकोरपणे नियोजन करावे --महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे   ★ रायगड येथे 5 जानेवारी 2024 रोजी "शासन आपल्या दारी" उपक्रमाचे भव्य आयोजन ★ शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागांचे दालन उभारणार     रायगड,दि.16 (जिमाका):- खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने  “ शासन आपल्या दारी ”  हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.       "शासन आपल्या दारी" या अभियानानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या...

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

  रायगड दि.15(जिमाका):-   मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय ,  नौकानयन , डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01  जानेवारी 2024   पासून मत्स्यव्यवसाय  प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे   सुरु होणा ऱ्या  प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांनी  दि.31 डिसेंबर 2023  पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी गणेश टेमकर यांनी केले आहे. या  प्रशिक्षणां तर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या  57  फूट लांबी असलेल्या 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205    अश्वशक्तीचे इं जि न असलेल्या  "मत्स्यप्रबोधिनी"  नोंदणी क्र.  IND-MH- 3- MM- 4266  या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाणार आहे. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे-  प्रशिक्षण कालावधी  दि. 01  जानेवारी  202 4  ते दि.30 जून 202 4  ( 6 महिने)   आवश्यक    पा...

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड दि.15(जिमाका):-   राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि.16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा.सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने निळगुण ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11 वा.निळगुण ता.माणगाव येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मौजे निळगुण बामणोली राजीवली रस्ता भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.  सकाळी 11:30 वा. रिळे सामाजिक सभागृह भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थित.  दुपारी 12 वा.चापडी उणेगाव रस्ता भूमिपूजन व कापडी सामाजिक सभागृह भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12:30 वा.चापडी ता. माणगाव येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेकडे प्रयाण. दुपारी 12:45 वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आगमन व रायगड जिल्हा शासन आपल्या दारी कार्यक्रम नियोजनासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित. स्थळ:- कॉन्फरन्स हॉल डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव.  दुपारी 2.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबे...

पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड दि.15(जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत हे   शनिवार दि. 16 डिसेंबर 2023  रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 16 डिसेंबर 2023  रोजी  11.30 वा. दादर पूर्व येथून मोटारीने महालक्ष्मी रेसकोर्स, मुंबईकडे प्रयाण दुपारी 12.00 वा. महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. हेलिकॉप्टरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हेलिपॅड, जि. रायगड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. रायगड जिल्हा शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक स्थळ : कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड. दुपारी 2.30 वा. लोणेरे येथून हेलिकॉप्टरने आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड ता.अलिबागकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. हेलिकॉप्टरने आर.सी.एफ. क्रिडा संकुल, कुरुळ हेलिपॅड, ता.अलिबाग येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी क...

गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी रायगड येथे कार्यालय कार्यान्वित

  रायगड दि.15(जिमाका):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत गुरव समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाने स्थापना केली असून गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी रायगड येथे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक   निशिकांत  नार्वेकर  यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या .,  श्री राम समर्थ सहकारी गृह .  संस्था मर्या .,  रुम नं . 101,  पहिला मजला ,  चेंढरे ,  हनुमान मंदिराच्या मागे ,  ता .  अलिबाग ,  जि.रायगड ,  ( संपर्कासाठी दुरध्वनी क्र . 02141-224448)  येथे संपर्क साधावा . 0000000

जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त आयोजित जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न

Image
  रायगड दि.14(जिमाका) :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्यामार्फत  जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त  जिल्हा प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यामध्ये कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, (के.एस.ओ.अलिबाग) या विद्यर्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.      या  जिल्हा  प्रश्न मंजुषा स्पर्धेत 19 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.  या स्पर्धाचा निकाल पुढीलप्रमाणे कु.स्नेहल सचिन जाधव, इयत्ता  9 वी, के.एस.ओ.अलिबाग या विद्यर्थिनीने प्रथम क्रमांक व कु.अविष्कार रविंद्र कदम , इयत्ता  9 वी, डी.के ई.टी. अलिबाग या विद्यार्थाने  द्वितीय क्रमांक मिळविला आहे.  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,  जिल्हा रुग्णालय, अलिबाग संजय माने  यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.    कु.स्नेहल सचिन जाधव व कु.अविष्कार रविंद्र कदम यांची  रायगड जिल्ह...