Posts

पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड(जिमाका)दि.12:- राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत हे मंगळवार, दि.16 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहेत. सोमवार, दि.15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वा.खेड येथून मोटारीने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.  रात्रौ 9.00 वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. मंगळवार, दि.16 जुलै 2024 रोजी सकाळी 11.00 वा. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग. दुपारी 1.00 वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.  दुपारी 2.00 वा. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना रायगड जिल्हा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : आरसीएफ हॉल कुरुळ, अलिबाग. सायंकाळी 4.00 वा. राखीव. अलिबाग, सायंकाळी 6.00 वा. अलिबाग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. ०००००००

जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी--जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड(जिमाका)दि.12:-  राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि  बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.  मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना ऐतिहासिक योजना आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.   जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’योजनेची आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी सा.प्र.रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण निर्मला कुचिक,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे,जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम कोशेट्टी,अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते     जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी या योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे अ...

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड योजना महिला बचतगटांच्या माध्यमातून बांबू रोपे नर्सरी तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  रायगड (जिमाका)दि.11:-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त     शेतकऱ्यांनी बांबू लागवड    योजनेचा लाभ घेऊन शेती पूरक व्यवसायातून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करावी, असे    आवाहन  जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांच्या माध्यमातून 1 कोटी बांबू रोपांची नर्सरी तयार करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हरित महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बांबू तसेच इतर वृक्ष मिशन मोडवर लागवड करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ.भरत बास्टेवाड, उपजिल्हाधिकारी रोहयो भारत वाघमारे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, निर्मला कुचिक, जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 कोटी बांबू रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी म...

स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा व सुका निळा मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

Image
           रायगड(जिमाका)दि.11:-  पावसाळयामध्ये  दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक जलजन्य आजार होतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जुंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येईल. यासाठी गावस्तरांवर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.  यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिले.  जिल्हास्तरीय कार्यशाळेस  प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी (आरोग्य) वंदनकुमार पाटील, प्रकल्प व्यवस्थापक आर्थिक (जजीमि) संगीता पाटील  आदी मान्यवर उपस्थित होते.  मान्सून हंगामामध्ये जिल्हयांतील ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखून जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलबध करून देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनसुार जिल्हयांत स्टॉप डायरिया अभियान राबविले जात आहे. या अभियानामध्ये गावातील प्राथमिक शाळा, ...

जुनी रद्दी विक्रीसाठी इच्छुक पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात

  रायगड(जिमाका)दि.11:-  प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या कार्यालयातील जुने कालबाह्य झालेले अभिलेखे निर्लेखित काढण्याच्या दृष्टीने रद्दी म्हणून विक्रीस काढण्यात येणार आहेत. यासाठी पात्र खरेदीदारांकडून दि.10 जुलै  ते दि.22 जुलै 2024 (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळता) या कालावधीमध्ये निविदा मागविण्यात येत असून पात्र खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल सचिन विधाते यांनी केले आहे. मागविण्यात आलेल्या निविदा दि. 23 जुलै 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनेवल, केंद्रीय सुविधा भवन, दुसरा मजला लोखंड व पोलाद बाजार, कळंबोली, पनवेल येथे उघडण्यात येतील.  निविदेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत :- शॉप अॅक्ट लायसन्स (अधिकृत व नोंदणीकृत खरेदीदार असल्याचे प्रमाणपत्र), टिन नंबर व जी.एस.टी. भरल्याबाबत रिटर्न, पॅनकार्ड, निविदाधारक हा सरकारमान्य प्रमाणपत्र धारक, अधिकृत रद्दीचा विक्रेता पाहिजे, पेपर मिलचे प्रमाणपत्र (व्यवसाय प्रमाणपत्र), अनामत रक्कम रूपये 10 हजार या राष्ट्रीय बँकेचा डी.डी. (प्रादेशिक परिवहन अधिक...

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात

  रायगड(जिमाका)दि.10:-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहीत्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश असून इच्छुक जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड एन.एस.पुरकर यांनी केले आहे. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी. नोंदणीधारक खरेदी दारांकडून सिलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये दि. 11 जुलै  ते दि.20 जुलै 2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायं.5.00 वाजेपर्यंत पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल. या नमुन्यातीलं पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5 हजार अनामत रक्कम जमा करणे गर...

ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत जिल्हा रुग्णालयास आवश्यक साहित्याची उपलब्धता

Image
    रायगड,दि.10(जिमाका) :- जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण आपल्या शारीरिक समस्यांवर उपचार घेण्यासाठी दुर्गम डोंगराळ भागातून येत असतात. सर्व सामान्यासमवेत गरीब गरजू रुग्ण येत असून त्यांची तापसणी व उपचार जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मोफत होतात. याकरिता ओ.एन.जी.सी. कंपनीमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत आवश्यक साहित्याची उपलब्धता करून देण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातर्फे ओ.एन.जी.सी. प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, ओ.एन.जी.सी.चे जीजीएम प्लांट मॅनेजर  डी. के. त्रिवेदी, सिजीएम सपोर्ट मॅनेजर  एस.के. चांद, जी.एम. हेड एचआर  श्रीम. भावना आठवले, मॅनेजर एचआर  गौरव पतंगे, इन्चार्ज सीएसआर  अंकुर देसाई, सी एस आर को-ओर्डीनेटर अभिषेक पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी-घुगे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चेतना पाटील, जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक  राजेश किणी, अधिपरिचारिका श्रीम. गायत्री म्हात्रे, सहा.अधिपरिचारिका श्रीम. अ...