Posts

कुलगुरू प्राध्यापक डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांचा मानद कर्नल पदवी पदग्रहण सोहळ्याचे दि.29 जुलै रोजी आयोजन

    रायगड(जिमाका) दि.26 :-  डॉ. बासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी संरक्षण मंत्रालय भारत सरकार कडून   जाहीर झाली असून सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा, सोमवार दि.29 जुलै 2024 रोजी दुपारी 12.15  मि. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केला आहे.  ही पदवी  विशिष्ट सेवा पदक मिळवले (vsm) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या शुभहस्ते  प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी कार्यकारी परिषदचे सदस्य,विद्या परिषदचे सदस्य  तसेच विद्यापीठातील  सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशातून 19 विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असू...

जिल्ह्यातील इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी

रायगड(जिमाका) दि.26 :-  जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 चे ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यासाठी पोर्टल दि. 16 जुलै 2024 पासून सुरु झाले आहे.    इयत्ता 6 वी साठी पात्रता -  विद्यार्थी  हा पाचवीत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये शासकीय तसेच शासनमान्य प्राप्त शाळेत रायगड जिल्ह्यात  शिकत असणे आवश्यक आहे,  विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील रहिवासी असावा, तसेच आधार कार्डवर रायगड जिल्ह्याचा रहिवासी पत्ता असणे आवश्यक आहे,  जन्म तारीख 01 मे 2013 ते 31 जुलै 2015 (दोन्ही दिवस धरून) मधील असावी,  यावर्षी आधारकार्ड आवश्यक असून त्यासाठी लिंक असणाऱ्या मोबाईलवर ओटीपी येणार असून पुढील अर्ज अपलोड करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, (यासाठी आधारकार्ड अपडेट करावे. आधारकार्ड नसल्यास शासकीय नियमानुसार पालकाचे याच जिल्ह्यातील पुरावा म्हणून  रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करावे,  अर्ज अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे साक्षांकित प्रमाणपत्र, स्कॅन केलेली विद्यार्थी व पालकाची सही इत्यादी बाबी तयार ठेवाव्या . अंतिम सबमिशन पूर्वी अर्ज...

जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा --उपसभापती आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे

    रायगड(जिमाका) दि.25:-  महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्य पूर्ण योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य आ.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज येथे केले.  अलिबाग येथील होरीझोन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा, पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळा  कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार भावनाताई गवळी, श्रीमती मीनाताई कांबळी, श्रीमती शीतलताई म्हात्रे, श्रीमती ज्योती ताई वाघमारे, श्रीमती कलाताई शिंदे, श्रीमती शिल्पाताई देशमुख, श्रीमती मानसी दळवी, श्रीमती संजीवनी नाईक, श्रीमती तृप्ती पाटील उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुरु जिल्ह्यातील महिलांनी...

रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांनी मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहावे

    रायगड(जिमाका) दि.25:-  रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 391 (09 बॅन्डस्मन पदे समाविष्ट) व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 31 रिक्त पदे भरण्याकरीता सन 2022-2023 ची भरती प्रकीया    दि. 21 जून 2024 रोजीपासून सुरु आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी न झालेल्या पुरुष उमेदवारांनी सोमवार, दि.29 जुलै 2024 रोजी सकाळी 06.00 वा.मैदानी चाचणीकरीता जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली, ता. अलिबाग, जि.रायगड येथे उपस्थित राहावे  असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दि.21 जून 2024 ते दि.23 जुलै 2024 या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. या कालावधीत पावसामुळे, एकाच दिवशी व लागोपाठचे दिवशी दोन पदांकरीता मैदानी चाचणीसाठी किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणांमुळे ज्या पुरुष उमेदवारांनी अद्यापपर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकाची मैदानी चाचणी दिली नाही, अशा पुरुष उमेदवारांना संधी/मुभा देण्यात येत आहे. पुरुष उमेदवार यांना ही शेवटची संधी देण्यात येत असून त...

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर

रायगड (जिमाका) दि.25:-  महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने 01 जुलै 2024 रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि.20 जून 2024 रोजीचे पत्रान्वये दि.1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा  “ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) ”  बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते. मात्र भारत निवडणूक आयोगाने  दि.24 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्य...

27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.25:-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 27 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातीत तडजोडीस पात्र प्रकरणे, प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी  दिली. सुमारे 50 हजार प्रकरणे या लोकअदालतीसमोर ठेवली जाणार आहेत. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातीत प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, बरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. सुमारे 50 हजार प्रकरणे या लोकअदालतीसमोर...

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना आवाहन प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

Image
  रायगड जिमाका दि. 25-  जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना केल्या.तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. याबरोबरच नागरिकांनो आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी जावळे यांनी अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यात भेट दिली. त्यांनी यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरु आहे.  जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली. नागरिकांनी काळजी घ्यावी, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये.  मानवी चुकांमु...