Posts

जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारणार* *-पालकमंत्री कु.आदिती तटकरे*

*पालकमंत्री कु.आदिती तटकरे "तेजस्विनी" पुरस्काराने सन्मानित*  अलिबाग,जि.रायगड,दि.5 (जिमाका):- अँड्रॉइड मोबाईल येण्याआधीचे शालेय जीवन खूपच सुंदर होते. परंतु काळ जसा बदलत आहे त्याप्रमाणे  शैक्षणिक व्यवस्थाही बदलण्याची  गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.       श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त "तेजस्विनी पुरस्कार" व "सरस्वती भूषण पुरस्कार" वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत हाेत्या.        यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा परिषद सदस्य  प्रगती अदावडे, सरपंच परविन नाझ, पंचायत समिती सदस्य मंगेश काेमनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, तहसिलदार सचिन गोसावी, प्राचार्य श्रीनिवास जोशी, गटविकास अधिकारी श्री.सिनारे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सिध्दू कोस...

अन्न व नागरी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा प्रशासन आणि नवी मुंबई पोलिसांची पनवेल येथे धडक कारवाई*

*सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आराेपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक         अलिबाग,जि.रायगड,दि.5 (जिमाका) :- जिल्हयातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ जुलै २०२० रोजी टेक केअर- लॉजिस्टीक, पळस्पे, ता.पनवेल येथील पलक रेशन गोडावून येथे छापा टाकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मे.टन तांदूळ जप्त केला आहे. त्यानुषंगाने संबंधितांविरुध्द दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ०२७४/२०२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वि.१२० (ब), ४२०, ४६५, ४६८,४७०,४७१, ३४ व सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ चे कलम १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ६अ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे दि.१४ ऑगस्ट व ०४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली हाेती. याबाबत पुढील अंतिम सुनावणी दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी हा...

*मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा*

                                                                        अलिबाग, जि.रायगड, दि.5 (जिमाका)- महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत "शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह" ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे.           या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई ची शासन मान्यता आहे. तसेच MSCIT या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे.          *प्रवेशासाठी नियम, अटी व सवलती :-* अभ्यासक्रमाचे नाव- सर्टिफि...

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शुक्रवार, दि.04 सप्टेंबर, 2020 रोजी, दुपारी 3.00 वा., सुनिती शासकीय निवासस्थान येथून शासकीय वाहनाने खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. सायं.5.00 वा. खारघर येथे आगमन व युथ हॉस्टेलची पाहणी. स्थळ : ग्रीन फिंगर स्कूलच्या बाजूला, सेक्टर-12, खारघर, नवी मुंबई.   सायं.6.00 वा. खारघर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. रात्रौ 8.30 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.             शनिवार, दि. 05 सप्टेंबर, 2020 रोजी, सकाळी 9.00 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन गोखले एज्युकेशन सोसायटी श्रीवर्धन, रायगड येथील 4 सेवानिवृत्त व्रतस्थ आणि तपस्वी शिक्षकांचा सरस्वती भूषण ग...

बाल कल्याण क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांनी बालशक्ती व बालकल्याण या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत

  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :-   बालशक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार 2021 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज www.nca.wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.15 सप्टेंबर 2020  पर्यंत आहे,  असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना बालशक्ती पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो. मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन वा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस बालकल्याण वैयक्तिक पुरस्कार दिला जातो. जी संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवरच अवलंबून आहे व...

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे “कोविड-19 योध्दा सन्मान शिक्षण योजना” जाहीर हॉस्पिटल, पोलीस दल, नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी योजना लागू

  अलिबाग,जि.रायगड, दि.3 (जिमाका) :-   प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था ही कोकणातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून संस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे 1998 पासून व राजेंद्र माने तंत्रनिकेतन सन 2010 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आंबव येथे कार्यरत आहे. करोना या संसर्ग विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हॉस्पिटल, पोलीस दल, नगरपालिका, महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचारी जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा, म्हणून संस्थेच्या अभियांत्रिकी पदवी, एमबीए व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये त्यांच्या पाल्यांसाठी “ कोविड-19 योध्दा सन्मान शिक्षण योजना ” ही मोफत शिक्षण शुल्क व मोफत वसतिगृह शिक्षण योजना 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर करण्यात आली आहे.   ही योजना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील हॉस्पिटल, पोलीस, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आहे. या योजनेंतर्गत प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात आटोमो...

करोना योद्धा, स्वयंसेवक, योगदानकर्ता म्हणून नाव नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी -जिल्हाधिकारी निधी चौधरी

  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :-   संपूर्ण जगात देश, राज्य आणि जिल्हा करोना विषाणूशी लढत आहे. या लढाईत दिवसेंदिवस करून करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सध्याच्या परिस्थितीत या लढाईसाठी डॉक्टर्स, नर्सेस, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ॲनेस्थेस्टिस्ट, आरोग्य कर्मचारी, केटरर्स, पेंटर्स अशा विविध क्षेत्रातील सेवा देणाऱ्या योद्धयांची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील जास्तीत जास्त कुशल नागरिकांनी करोना विरुद्धच्या या लढाईत स्वतःचे नाव करोना योद्धा, स्वयंसेवक, योगदानकर्ता म्हणून नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या raigad.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवाहन केले आहे. 0000