पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग, जि.रायगड, दि.4 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            शुक्रवार, दि.04 सप्टेंबर, 2020 रोजी, दुपारी 3.00 वा., सुनिती शासकीय निवासस्थान येथून शासकीय वाहनाने खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. सायं.5.00 वा. खारघर येथे आगमन व युथ हॉस्टेलची पाहणी. स्थळ : ग्रीन फिंगर स्कूलच्या बाजूला, सेक्टर-12, खारघर, नवी मुंबई.  सायं.6.00 वा. खारघर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. रात्रौ 8.30 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 05 सप्टेंबर, 2020 रोजी, सकाळी 9.00 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन गोखले एज्युकेशन सोसायटी श्रीवर्धन, रायगड येथील 4 सेवानिवृत्त व्रतस्थ आणि तपस्वी शिक्षकांचा सरस्वती भूषण गौरव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :प्रि.टी.ए.कुलकर्णी सभागृह, गोखले एज्युकेशन सोसायटी, आर्टस,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, श्रीवर्धन. दुपारी 12.30 ते 1.00 वा.राखीव.  दुपारी 1.00 वा. श्रीवर्धन येथून वडघर-पांगळोलीकडे ता.श्रीवर्धनकडे प्रयाण व कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रस्तावित जागेची पाहणी. सोईनुसार सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दि. 06 सप्टेंबर, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा., सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा.सुनिती शासकीय निवासस्थान येथे आगमन.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज