Posts

विद्यार्थ्यांना टॅबलेट व सिमकार्ड वाटप करण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

अलिबाग,दि.10(जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे(महाज्योती) मार्फत JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे.      त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील एकूण 67 विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप करण्यासाठी दि.13 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.      संबंधित विद्यार्थ्यांनी येताना स्वत:चे आधारकार्ड, ओळखपत्र, पालकांचे आधारकार्ड, ओळखपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी गुणपत्रक, बोनाफाईड ही कागदपत्रे सोबत आणावीत. तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिराजवळ, श्रीबाग रोड, अलिबाग येथे किंवा कार्यालयाच्या 8007473157 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी कळविले आहे. ००००००

कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालत उद्घाटन कार्यक्रम संपन्न

Image
  अलिबाग,दि.10,(जिमाका):-  मा.उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे निर्देशानुसार  “ न्याय आपल्या दारी ”  या संज्ञेतर्गत दि.9 मार्च ते दि.7 एप्रिल 2023 या कालावधीत रायगड जिल्हयात  कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे.              या कायदेविषयक शिबिरे व फिरते लोक अदालतींचा उद्घाटन समारंभ दि.9 मार्च 2023 रोजी रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड श्रीमती.एस.एस.सावंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाला.              यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 श्री.अशोककुमार भिलारे, जिल्हा न्यायाधीश-2 श्री.अ.थट्टे, जिल्हा न्यायाधीश-3 श्री.एन.मणेर, श्रीमती एस.उगले, राष्ट्रीय प्राधिकरण विधी सचिव रायगड श्री.अमोल शिंदे, निवृत्त न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, श्रीमती एस.सोनी, श्रीमती वर्षा पाटील, श्रीमती एस.मुळीक, श्रीमती जे.कोकाटे, श्रीम...

जागतिक महिला दिनानिमित्त वरसोली बीच समुद्र किनारी महिलांकरिता पारंपारिक खेळाचे आयोजन

Image
    अलिबाग,दि.9,(जिमाका) :-  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड,नेहरू युवा केंद्र अलिबाग,प्रिझम सामाजिक संस्था अलिबाग, श्रीबाग लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांकरिता पारंपारिक खेळाचे आयोजन वरसोली बीच समुद्र किनारी येथे दि. 8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेपासून  करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून रायगड जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले, ॲड.नेहा राऊत, ॲड.कलाताई, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या श्रीमती तपस्वी गोंधळी, नेहरू युवा केंद्र अलिबाग चे समन्वयक श्री निशांत रौतेला, श्रीमती प्राची जोशी, श्रीमती प्राजक्ता कोकणे, श्रीमती सुचिता साळवी, श्रीमती मनीषा मानकर, श्री.सचिन निकम, श्री.संदीप वांजळे, अलिबाग पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री प्रकाश सोनवडेकर, सिद्धार्थ खंडाळे, वरसोली ग्रामपंचायत चे सदस्य महिला, महिला, विद्यार्थिनी आदी संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला ब...

माणगाव दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न माणगाव न्यायालयामुळे पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल -न्यायमूर्ती अमित बोरकर

Image
    अलिबाग,दि.09(जिमाका):-   माणगाव येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि.5 मार्च2023  रोजी माणगाव जिल्हा सत्र न्यायालय परिसरात पार पडला. या न्यायालयामुळे येथील पक्षकारांना जलद व योग्य न्याय मिळेल, असे उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांनी सांगितले. उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड जिल्हा अलिबाग अमित बोरकर यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला न्यायालय कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.      यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा सावंत, जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश नवनाथ कोले, न्यायाधीश सर्वश्री.फुझळके, साटोटे, पाठारे, निवृत्त न्यायाधीश जहागीरदार, माजी पालकमंत्री आमदार कु.आदिती तटकरे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माणगाव बार असोसिएशन अध्यक्ष ॲड.महेंद्र मानकर, ॲड. राजीव साबळे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, ॲड.विनोद घायाळ, माणगाव नगरपंचायत नगरसेवक, श्रीवर्धन, महाड, रोहा, बार ...

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन

    अलिबाग,दि.09(जिमाका):-   ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत 5.17 लक्ष स्वयं सहाय्यता गटांची स्थापना झालेली असून त्यामाध्यमातून 60 लक्ष कुटुंबांना अभियानाशी जोडले आहेत. या अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेले स्वयं सहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने सन 2022-23 या कालावधीतील महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे दि.08 ते 19 मार्च 2023 या कालावधीत सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (CIDCO Exhibition & Convention Center), वाशी, नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या तयार केलेल्या वस्तू उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्य पदार्थ सहजपणे शहरी नागरीकांपर्यंत पोहचविता ये...

उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय संस्थेचा राज्यात चौथा क्रमांक

                     अलिबाग,दि.09(जिमाका):-  शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या. खरसई या संस्थेने राज्यात चौथा क्रमांक पटकावला. सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे झालेल्या महालक्ष्मी सरस कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते रोख रक्कम पन्नास हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांनी सहभागी घेतला होता. संस्थेने किशोर शिताळे यांच्या संकल्पनेनुसार राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ काळसुरी यांच्या यशोगाथेवर आधारित उमेद या नावाने लघुपटाची निर्मिती...

प्राणी क्लेष सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्य नेमणुकीसाठी इच्छूक व्यक्ती/संस्थांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.08(जिमाका):-  रायगड जिल्ह्याच्या प्राणी क्लेष सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणूका करण्याविषयी महाराष्ट्र शासनाच्या कृषी,पदुम विभागाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या समितीवर रायगड जिल्ह्यातील शासनमान्य गोशाळा, पांजरापोळ यांच्याकडील एक सदस्य, प्राणी कल्याणासाठी झटणाऱ्या विश्वस्त संस्थाकडून दोन सदस्य तसेच प्राण्यांबाबत मानवतावादी कार्य करणारे, प्राणी प्रेमी यांच्यातून 5 ते 6 सदस्यांची नेमणूक करावयाची आहे.  याकरिता रायगड जिल्ह्यातील गोशाळा, पांजरापोळ, प्राण्यांविषयी कार्य करणाऱ्या विश्वस्त संस्था, प्राण्याबाबत मानवतावादी कार्य करणाऱ्या पात्र इच्छूक व्यक्ती/संस्था यांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड अलिबाग यांच्याकडे संपर्क करुन अर्ज प्राप्त करुन घ्यावा.अर्ज दि.15 मार्च 2023 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त रायगड-अलिबाग कार्यालयाकडे सादर करण्यात यावा. अर्जासोबत त्यांनी केलेल्या प्राणी कल्याणविषयक कार्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र स...