विद्यार्थ्यांना टॅबलेट व सिमकार्ड वाटप करण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन


अलिबाग,दि.10(जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे(महाज्योती) मार्फत JEE/NEET/MHT-CET चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

     त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील एकूण 67 विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप करण्यासाठी दि.13 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

     संबंधित विद्यार्थ्यांनी येताना स्वत:चे आधारकार्ड, ओळखपत्र, पालकांचे आधारकार्ड, ओळखपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी गुणपत्रक, बोनाफाईड ही कागदपत्रे सोबत आणावीत. तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिराजवळ, श्रीबाग रोड, अलिबाग येथे किंवा कार्यालयाच्या 8007473157 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान