Posts

12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

  रायगड(जिमाका)दि.05:-   रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि.24 नोव्हेंबर 2023 अधिसूचना अन्वये सन 2024 या वर्षाकरीता सोमवार, दि.19 ऑगस्ट 2024 रोजी  नारळीपोर्णिमा/रक्षाबंधन, मंगळवार, दि.27 ऑगस्ट 2024 रोजी, गोपाळकाला, गुरुवार, दि.31 ऑक्टोबर 2024 रोजी, नरक चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. तथापि रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या सणाचा एक भाग म्हणजेच ज्येष्ठा गौरी विसर्जन मोठया उत्साहात साजरे केले जाते. त्यामुळे दि.24 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेली गुरुवार, दि.31 ऑक्टोबर 2024 रोजीची नरक चतुर्दशी यासणाची स्थानिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी गुरुवार, दि.12 सप्टेंबर 2024 रोजीची स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केली आहे. ०००००००

काजू बी शासन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

    रायगड (जिमाका) दि.04 :-   राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज सादर करावयाची मुदत दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ  संजय कदम यांनी केले आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या  www.msamb.com  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, 7/12, कृषी खात्याचा दाखला. जी.एस.टी.बील. बँक तपशिल, आधा कार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान माग...

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -- जिल्हाधिकारी किशन जावळे

   रायगड (जिमाका),दि.3:- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता  सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे  यांनी केले.  राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना  सुरू करण्यात आली आहे.  या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  यापूर्वी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी  सप्टेंबर 2024 मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा.             0000

वातावरणीय बदल आणि जैवविविधता आधारित पध्दतींबाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.30:-   आगा खान एजन्सी फॉर हॅबीटेट, इंडिया ही संस्था वातावरणीय बदल आणि जैवविविधता आधारित पध्दतींबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्य करत आहे. या संस्थेमार्फत रायगड जिल्हयामध्ये Climate Change Adaptation-Coastal Restoration Programm अलिबाग आणि मुरुड तालुक्यात राबवित आहे. या कार्यक्रमाबाबत जिल्हा ते ग्रामस्तरावरील विविध विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता जनजागृतीसाठी  सोमवार,दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा ते दु.3.00 वा. पर्यंत जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्र.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी दिली आहे. या कार्यशाळेस अलिबाग व मुरुड तालुक्यातील समुद्र व खाडी किनारी लगतच्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, संबंधित वन अधिकारी/कर्मचारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, कांदळवन कक्षातील अधिकारी/कर्मचारी, सहाय्यक आयुक्त, मत्स व्यवसाय अधिकारी, मच्छिमारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी/प्रतिनिधी, सागरी सुरक्षा दलाचे स्वयंसेवक इ. अधिकारी/कर्मचारी...

गणेशोत्सव-2024 रायगड जिल्हा शांतता समिती बैठक सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्ह्यात 1 लाख 3 हजार 24 खासगी तर 273 सार्वजनिक मंडळाचे गणपती गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क

Image
    रायगड(जिमाका)दि.30:- जिल्ह्यात दि.07 सप्टेंबर पासून गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 03  हजार 24 खासगी तर 273 सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहेत. कोकणातील गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहनांची वाहतूक नियंत्रीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. गणेशोत्सव-2024 शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक गृह विभाग पांडूरंग गोपणे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सा.बा.वि.अलिबाग जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिक...

जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.22 :- राष्ट्रीय पशुधन अभियान समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पशुसंवर्धन विभाग रायगड यांच्यामार्फत शुक्रवार, दि.23 ऑगस्ट 2024 रोजी नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे सकाळी 11.00 वाजता जिल्हास्तरीय एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून जिल्हातील इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यशाळेस उपस्थित राहून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजानांचा लाभ घेवून जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका साकारावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.  या कार्यशाळेस  जिल्हाधिकारी  किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाडे,  प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, मुंबई विभाग, मुंबई, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, रायगड-अलिबाग, प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील देशी पशुधनाच्या विविध जातींचा विकास करून त्यांची उत्पादकता वाढविणे व पशुपालकांमध्ये उद्योजकता विकसित करून नव उ‌द्योजक निर्माण करून पशुपालन हा प्राथमि...

जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन

    रायगड(जिमाका)दि.22 :- 'रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन' च्यावतीने शनिवार दि.24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता क्षात्रैक्य सभागृह, कुरुळ-अलिबाग येथे मा.न्यायमूर्ती श्री.अभय ओक (न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायलय, नवी दिल्ली) यांचे, 'जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व' या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रसाद पाटील यांनी दिली आहे.   या प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून मा.न्यायमूर्ती श्री.आर.आय. छागला (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.न्यायमूर्ती श्री. एम.एम.साठ्ये (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.ए. एस. राजंदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड उपस्थित राहणार आहेत.  तर विशेष निमंत्रित म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा पदाधिकारी अॅड. राजेंद्र उमाप,अध्यक्ष, अॅड. डॉ.उदय वारुंजीकर उपाध्यक्ष, अॅड.हर्षद निंबाळकर, अॅड.गजानन चव्हाण, अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख सदस्य  उपस्थित राहणार आहेत. ०००००००