माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

 

रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका) :-राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहे. प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 असून जास्तीत पत्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

            राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, समाज माध्यम पुरस्कार. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2025 या कॅलेंडर वर्षाकरीता दि.01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 15 मार्च, 2026 अशी राहील.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2025 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने यासोबत पाठविण्यात येत आहेत. तसेच सदर माहिती शासनाच्या www.maharashtra.gov.in, आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in,  या ब्लागवर उपलब्ध आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान