श्री गुरु तेग बहादूर ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

 

 

नवी मुंबई, दि. ०१ :  हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.

सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.वाहे गुरु व बोले सो निहाल सत श्री अकाल च्या जयघोषात श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले जात आहे.

संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. अखंड कीर्तन, गुरुवाणी आणि प्रार्थनेमुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले होते.

लंगर व सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था

भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत सुरू आहे. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्व धर्माच्या भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत आहेत.

            भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून लाखो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. तसेच चहा, अल्पोपहार, ज्यूस आणि विविध माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

त्याग आणि मानवतेचा संदेश

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या अद्वितीय त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमातून करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून समाजात बंधुता, एकता आणि सर्वधर्मसमभावाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन