छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

 

 

रायगड-अलिबाग,दि.24(जिमाका):- दि.18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयान्वये रोहा तहसिलदार कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान  कार्यक्रमांतर्गत दि.7 मार्च 2026 रोजी कोलाड, दि.14 मार्च 2026 रोजी नागोठणे, दि.10 एप्रिल 2026 रोजी चणेरा, दि.14 एप्रिल 2026 रोजी निडी तर्फे अष्टमी, दि.17 एप्रिल 2026 रोजी घोसाळे, दि.1 मे 2026 रोजी निडी तर्फे अष्टमी तसेच दि.8 मे 2026 व दि.15 मे 2026 रोजी सकाळी 11.00 वा. नगर परिषद रोहा येथे शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही  तहसिलदार डॉ.किशोर देशमुख यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती करणे, भोगवटदार वर्ग 2 जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे, जिवंत 7/12 अंतर्गत वारस नोंदी करणे, तुकडे बंदी कायद्यानुसार कार्यवाही करणे, आधार कार्ड,  जातीचे दाखले, रहिवासी दाखले, वय अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड ची सर्व कामे, जेष्ठ नागरिक दाखले, सांगयो, इगायो, फॉर्म भरून ज्यांचे वय वर्ष 18 पूर्ण झालेले आहेत अशा मतदारांचे नवीन मतदानओळखपत्र बनविण्याकामी फॉर्म भरून घेणे तसेच या शिबिरादरम्यान विविध योजनेसाठी लाभार्थीनी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देणार आहे.  तसेच सद्य  परिस्थितीत नागरिकांना व विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले या शिबिरात देण्यात येणार आहेत.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान