Posts

राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 या वर्षातील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

नवी मुंबई, दि. 16  :   राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या   www.mpsc.gov.in   या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे , सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2018 जाहिरात नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी होणार आहे.   राज्य सेवा परीक्षा 2019 जाहिरात डिसेंबर   2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे.   मुख्य परीक्षा दिनांक 13,14 व 15 जुलै 2019 रोजी होणार आहे.    महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 जाहिरात जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 24 मार्च 2019 रोजी होणार आहे.    महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -1   मुख्य परीक्षा दिनांक 28 जुलै 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -2 पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा दिनांक 04 ऑगस्ट 201...

राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिनः नाचणी, वरी चे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
             अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- नाचणी वरी यासारख्या पोषणमूल्य असणाऱ्या तृणधान्याचे आहारातील महत्त्व खूप आहे. आहारात या धान्यांचा समावेश व्हावा यासाठी रायगड जिल्ह्यात नाचणी, वरी सारख्या तृणधान्य पिकांखालील क्षेत्र वाढविण्याची गरज आहे, त्यासाठी कृषि विभागाने गावपातळीवर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. राष्ट्रीय पौष्टीक अन्नधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, आहारतज्ज्ञ   डॉ. शंकर फुलवाले, उपशिक्षणाधिकारी सुनिल गवळी   तसेच कृषि विभागाचे अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने सन 2018- 19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष घोषित केले आहे. ज्वारी, बाजरी, रागी व अन्य लघु अन्नधान्ये या पिकांना त्यांचे आहारातील महत्त्व लक्...

पत्रकारितेचे स्वरुप बदलले मात्र महत्त्व कायम- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
             अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका)- डिजीटल युगात पत्रकारितेत अनेक बदल झाले असले तरी पत्रकारांनी बाळगावयाचे सामाजिक जबाबदारीचे भान तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळेच पत्रकारितेचे महत्त्व टिकून आहे, असे प्रतिपादन जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार यांनी आज येथे केले. लोकशाही प्रणालीत असलेले पत्रकारितेचे स्वरुप डिजीटल क्रांतीमुळे बदलले असले तरी   महत्त्व  मात्र कायम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय समारोप करतांना केले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ‘डिजीटल युगातील पत्रकारिताः आचारनिती आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे अयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, विजय चवरकर, दैनिक रायगड टाईम्सचे संपादक राजन वेलकर, दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप,...

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण येथे दुचाकीसाठी नवीन मालिका MH-06-BZ सोमवार दि. 19 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.   मालिका सुरु होण्याची दिवशी अर्ज कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी अडीच पर्यंत स्विकारले जातील.   प्रथम तीनपट रक्कम भरणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल   एकाच दिवशी एकाच पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदरचा पसंती क्रमांक बंद लिफाफ्यात विनिर्दिष्ट केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष (Demand Draft) सादर केल्यानंतर जाहीररित्या जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्याला देण्यात येईल यांची नोंद घ्यावी.   पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची पध्दतीची माहिती कार्यालयीन सूचना फलकावर उपलब्ध आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे. 00000

पत्रकार दिनानिमित्त आज चर्चासत्र

            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि.16 रोजी  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे . ‘डिजीटल युगातील पत्रकारिताः आचारनिती आणि आव्हाने’ हा चर्चासत्राचा विषय असून यासंदर्भात जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार हे मार्गदर्शन करणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व पत्रकार, माध्यमकर्मींनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे. 00000

करंजा बंदराची प्रधानसचिवांनी केली पाहणी : मूल्यवर्धनासाठी मासेमारी सोबत प्रक्रियाही आवश्यक- प्रधानसचिव अनुपकुमार यांनी मच्छिमारांशी साधला संवाद

            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- जिल्ह्यातील उत्तम मासळीला चांगली मागणी आहे. मात्र मिळणारे बाजारमूल्य वाढवायचे असेल तर मासेमारी करतांना त्यासोबत मासे प्रक्रिया-साठवणूकीलाही चालना देणे आवश्यक आहे. त्यासाठी करंजा बंदरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, असे निर्देश राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार यांनी  आज करंजा ता. उरण येथे करंजा बंदर भेटी प्रसंगी दिले.              प्रधानसचिव अनुपकुमार यांनी आज करंजा येथे बंदर पाहणी केली व त्यानंतर मच्छिमार बांधवांशी चर्चा केली. यावेळी त्यांचे समवेत  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, प्रादेशिक उपायुक्त युवराज चौगुले, सह आयुक्त मत्स्यव्यवसाय राजेंद्र जाधव,  जेएनपीटी विश्वस्त महेश बाल्दी,  महाराष्ट्र मेरीटाईम  बोर्डाचे मुख्य अभियंता डॉ. महेश डेकाटे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड  अभयसिंह शिंदे इनामदार तसेच अन्य अधिकारी उप...

चारा उत्पादन, बांधणी व साठवणुकीवर भर द्या- प्रधानसचिव अनुपकुमार : जिल्ह्यातील 29 पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकीत

Image
            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याकरीता जिल्ह्यात चारा उत्पादन, तसेच उपलब्ध चाऱ्याची उत्तम बांधणी व साठवणूकीचे डेपो तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची क्षमता बांधणी   करुन भर द्या, असे निर्देश राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार यांनी   आज येथे दिले. यावेळी जिल्ह्यातील 29 पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल त्यांना अनुपकुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय   विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार हे आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय   विभागाचा आढावा एका बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव विजय चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अध...