Posts

माझं मत, माझा महाराष्ट्र या माध्यमातून कर्जत तालुक्यात स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून मतदार जनजागृती

Image
रायगड अलिबाग दि.10 :- भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. विजय सूर्यवंशी-, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी, सुनिल जाधव   यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विधानसभा मतदार संघ वैशाली परदेशी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विक्रम देशमुख यांच्या सहकार्याने "विधानसभा   निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर कर्जत विधानसभा मतदार संघात चित्ररथ फिरवून मतदान जागृती केली. स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून दहिवली, कर्जत पोलीस स्टेशन, कपालेश्वर मंदिरा समोर, कर्जत रेल्वे स्टेशन, मच्छीगल्ली, धापया मंदिरा शेजारी, कर्जत नगर परिषदेसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर, ...

उरण येथे औद्योगिक कंपन्यांमध्ये मतदान जनजागृती

Image
रायगड अलिबाग दि.10 :- उरण विधानसभा मतदार संघ स्वीप समितीमार्फत ग्रॅन्डवेल नॉर्टन कंपनी, मोरा, GTPS कंपनी, बोकडवीरा, BPCL कंपनी, भेंडखळ, ONGC कंपनी, नागाव उरण या कंपनी मधील अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली.   कामगार व त्यांच्या कुटूंबियांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन स्वीप समितीमार्फत करण्यात आले. तसेच यावेळी कामगारांकडून सामुहिक संकल्प पत्र वाचन करण्यात आले 0000000

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रायगड अलिबाग दि.10 :-विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून   ते आठ ऑक्टोबर   या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 209 गुन्हे नोंद केले असून त्यात 130 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.    त्यात एकूण रु.32 लाख 57 हजार 608 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   तसेच एकूण 14 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. निवडणूक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी या विभागाने विशेष लक्ष दिले आहे.   त्यानुसार वाहन तपासणी करणे, संशयित ठिकाणांवर छापे टाकणे व रात्रीच्या वेळी गस्त घालणे अशी कारवाई करण्यात येत आहे.   कलम 93 अंतर्गत सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीबाबतचे बंधपत्र घेण्यासाठी संबंधित प्रांताधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.   निवडणूक कालावधीमध्ये बंधपत्राचा भंग केल्यास गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.   आचारसंहिता कालावधीमध्ये मद्यविक्री अनुज्ञप्त्या विहित वेळेत उघडणे व बंद करणे यावर क्ष...

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक- 2019 साठी निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल

Image
रायगड   (जिमाका) दि. 07 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून सर्व साधारण निवडणूक निरीक्षक श्रीमती रेणु जयपाल (आय.ए.एस), श्री.बी.परमेसवरन (आय.ए.एस) आणि श्री.एस.हरिकिशोर (आय.ए.एस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचे स्वागत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केले. 188-पनवेल व 189-कर्जत साठी श्रीमती रेणु जयपाल (आय.ए.एस.) सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत.   यांच्या संपर्क अधिकारी म्हणून श्रीमती शशीकला अहिरराव या असून त्यांचा संपर्क क्रमांक   7507251511, 8208123951 असा आहे. 190-उरण व 191-पेण साठी श्री.बी. परमेसवरन (आय.ए.एस.) सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक आहेत. यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.बनसोडे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9619368365 असा आहे. 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन व 194-महाड साठी श्री.एस.हरिकिशोर (आय.ए.एस.) सर्व साधारण निवडणूक निरीक्षक आहेत यांचे संपर्क अधिकारी म्हणून श्री.रमेश पंडीतराव पाटील   असून त्यांचा संपर्क क्रमांक 8108...

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 78 उमेदवार आज 34 उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे

रायगड अलिबाग दि.07 :- महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी   34   उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण   78   उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली. 188-पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण 10 उमेदवार रिंगणात 189-कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण 11 उमेदवार रिंगणात 190-उरण विधानसभा मतदार संघात एकूण 8 उमेदवार रिंगणात 191-पेण विधानसभा मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात 192-अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवार रिंगणात 193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण 14 उमेदवार रिंगणात 194-महाड विधानसभा मतदार संघात एकूण 8 उमेदवार रिंगणात             असे एकूण 78 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. 00000

तळोजा औद्योगीक वसाहतीत मतदान जनजागृती कार्यक्रम

Image
रायगड अलिबाग दि.07 : तळोजा येथील   औद्योगिक वसाहतीतील    एक्साईड इंडस्ट्रीज ,   2. मायलॉन लॅबोरोटरीज आणि     असाही इंडीया ग्लासेस   या   कारखान्यातील सुमारे 500 कामगार   व   कर्मचारी आणि त्यांचया कुटुंबियांना   दि. 21 ऑक्टोबरला मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.   SVEEP कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय SVEEP समिती मार्फत हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामगारांना मतदान हे राष्ट्रीय काम समजुन   मदतान करावे. मी मतदान करणारच अशी शपथ   देण्यात आली. 00000

अलिबाग तालुक्यात स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून जनजागृती

Image
रायगड अलिबाग दि.07 : भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी - डॉ. विजय सूर्यवंशी,   उपजिल्हाधिकारी निवडणूक- वैशाली माने, नोडल अधिकारी, स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव   यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हयात विधानसभा निवडणुक मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदान जनजागृती विषयी चित्ररथ व पथनाटय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.                अलिबाग येथे आज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी - शारदा पोवार, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी- सचिन शेजाळ , यांच्या प्रमुख उपस्थितीत " विधानसभा   निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर चित्ररथ फिरवून स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून अलिबाग ...