Posts

माथेरान येथील शासकीय भूखंडांबाबत जिल्हा प्रशासनाकडून न्यून मुद्रांक शुल्क वसुलीची कार्यवाही सुरू

  अलिबाग,जि.रायगड,दि.01, (जिमाका) :- मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड यांनी मौजे माथेरान येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पारित हस्तांरतण व नूतनीकरणांच्या आदेशांच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीनुसार, साधारणतः सन 2010 पासून तपासणी केलेल्या प्रकरणांमध्ये करारनामा दस्त निष्पादित न होता, नोंदणी शुल्क/ मुद्रांक शुल्क शासन जमा करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पडताळणी समिती गठित करुन, तपासणी करणे व मुद्रांक शुल्क वसूल करण्याबाबत कार्यवाही करण्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पडताळणी केल्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने संबंधित भाडेपट्टाधारक यांनी अद्यापही करारनामा/ दस्त निष्पादित न केल्याने, या कार्यालयामार्फ...

उजळोली पाझर तलावाच्या 2 कोटी किंमतीच्या दुरुस्ती प्रस्तावास शासनाची मान्यता मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यशस्वी

    अलिबाग,जि.रायगड,दि.01, (जिमाका) :- खालापूर तालुक्यातील उजळोली पाझर तलावाच्या तब्बल रु.2 कोटी 61 लक्ष 8 हजार 780 इतक्या किंमतीच्या दुरुस्ती प्रस्तावास सातत्याने वैयक्तिक पाठपुरावा करून शासनाची मान्यता मिळविण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यशस्वी झाल्या आहेत. खालापूर तालुक्यातील उजळोली येथील पाझर तलाव हे काम उजळोली गावाच्या स्थानिक नाल्यावर सन 1988 मध्ये रायगड जिल्हा परिषद यांच्यामार्फत पूर्ण झाले होते. ही योजना ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत दुरुस्ती कार्यक्रम आराखड्यात प्राधान्य क्रमांक एक मध्ये आहे. या पाझर तलावाचा संकल्पित पाणीसाठा 531.49 सघमी व मूळ सिंचन क्षमता 30.4 हेक्टर असून याच्याव दुरुस्तीनंतर 30.4 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. जुलै-ऑगस्ट 2019 च्या अतिवृष्टीमुळे या तलावाच्या दगडी बांधकामातील विहिरीजवळ गूरळ पडल्यामुळे मुख्य विमोचक, पोहोच कंड्यूट आरसीसी पाईप व त्या बाजूच्या भरावातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने माती धरणास धोका होऊन फुटू नाही यासाठी धरणाच्या मजबुतीकरणासह नवीन प्रचलित पद्धतीने माती धरणाचे नूतनीकरण होणे आवश्यक होते. ह...

ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांनी नोंदणी करावी--उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते

  अलिबाग , जि.रायगड , दि. 24( जिमाका) :- केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 पारित केला आहे. त्यानुषंगाने बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळे विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यांच्यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्यासाठी दि. 20 ऑगस्ट 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जाणार आहेत. केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अन्वये असंघटित कामगारांची व्याख्या :- गृह उद्योग करणारा, स्वयंरोजगार करणारा, असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारा, संघटीत क्षेत्रातील कामगार ज्याला औद्योगिक विवाद अधिनियम, 1947 आणि सामाजिक सुरक्ष...

खेलो इंडिया यूथ गेम्स जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात खेळामध्ये प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यास यश नक्की मिळते -आंतरराष्ट्रीय धावपटू तथा उरण प्रांताधिकारी ललिता बाबर

    अलिबाग , जि.रायगड , दि. 24 ( जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी का र्या लय , रायगड यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी , पनवेल येथे करण्यात आले . या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील 18 वर्षाखालील मुलांच्या एकूण 16 संघांनी सहभाग घेतला . स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा प्रांताधिकारी उरण श्रीमती ललिता बाबर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . यावेळी श्रीमती ललिता बाबर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले . खेळाडूंनी आपल्या खेळांमध्ये प्रामाणिक कष्ट घ्यावे तसेच खेळांमधील जय- पराजय हे खिलाडू वृत्तीने स्वीकारावेत . पराजित झालेल्या खेळाडूंनी निराश न होता पुन्हा नव्या जोमाने पुढील स्पर्धेची तरी करून अधिकाधिक यश संपादन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत , त्यांनी उपस्थित खेळाडूंना सांगितले. त्याचबरोबर उपस्थित तसेच जिल्‍ह्यातील सर्व खेळाडू युवक- युवती ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदार नाव नोंदणी मोहिमेत सहभाग घेऊन मतदार यादीमध्ये आपले न...

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्रशासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु केली आहे. यावर्षी NSP 2.0 पोर्टल वर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि. 18 ऑगस्ट 2021 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021, शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख दि.15 डिसेंबर 2021 अशी आहे. अर्ज भरण्यासाठीच्या अटी व शर्ती - इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय/निमशासकीय/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासन...

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे युवा खेळाडू व युवकांसाठी चर्चासत्र संपन्न

    अलिबाग , जि.रायगड , दि. 24 ( जिमाका):- आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आणि प्रिझम संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने "Daily Lifestyle, Fitness and Diet" या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय येथे काल (दि.23 नोव्हेंबर 2021 ) रोजी करण्यात आले होते. या चर्चासत्रात अ‍ॅड.दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या अ‍ॅड. निलिमा हजारे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. निशांत रौतेला, भारतीय भूदल सेनेतील श्री.मयुरेश गावंड आदी मान्यवरांनी उपस्थित युवा खेळाडू व   युवकांना मार्गदर्शन केले. 0000000

अलिबाग तहसिल कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

    अलिबाग , जि.रायगड , दि. 24 ( जिमाका):- अलिबाग तहसिलदार कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज अलिबाग तहसिल कार्यालय येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी   मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.   या शिबिराचे उद्घाटन अलिबागच्या तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ.श्री. हुलवान, लायन्स क्लब, श्री. जित टोळकर, निवासी नायब तहसिलदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची रक्तदाब, मधुमेह, दातांचे आरोग्य, थायरॉईड व सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. ०००००००