Posts

रायगड जिल्हा प्रशासनाची “परिवर्तन” कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध

अलिबाग, दि.28 (जिमाका):-  रायगड जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 2) ही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून सर्व नागरिकांना  https://raigad.gov.in/en/ parivartanebook/  या लिंकवर वाचण्याकरिता विनामूल्य उपलब्ध आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी दि.01 मे 2022 रोजी संपन्न झाले. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीतील राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 1) ही कार्यपुस्तिकादेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर 24 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी पदी रुजू झाल्यानंतर प्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहन्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी ऑगस्ट-सप्टेंबर 2021 महिन्यात  “ परिवर्तन ”  घडवून आणण्याची मनाशी खूणगाठ बांधली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कामकाजास उत्साहान...

कोकण किनारपट्टीवरील 31 ऑगस्टपर्यंत वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद

  अलिबाग,  दि.28 (जिमाका): -   कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग मधील समुद्रकिनाऱ्यांवर दि.26 मे 2022 पासून ते दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मुरुड येथील जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान या बंदी कालावधीतही व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स   किंवा बोटिंग सुरु ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग या साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी येतात.   दरम्यान हा निर्णय मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील बोट दुर्घटनेमुळे घेतलेला नसून मान्सून काळात दरवर्षीप्रमाणे करावयाची कार्यवाही आहे. पावसाळा तसेच समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी घालण्यात आली आहे. 00000

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी; जिल्ह्यात एकूण 1 लाख 73 हजार 890 लाभार्थ्यांनी केली नोंदणी

अलिबाग, दि.27 (जिमाका): - शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण रु.6 हजार प्रति वर्ष लाभ अनुज्ञेय आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 1) जमीन धारण करणारी संस्था, 2) संविधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी/माजी व्यक्ती, 3) आजी/माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा/राज्यसभा आजी/माजी सदस्य, विधानसभा/ विधान परिषद आजी/माजी सदस्य, महानगरपालिकेचे आजी/माजी महापौर, जिल्हा परिषदेचे आजी/माजी अध्यक्ष, 4) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील नियमित अधिकारी/ कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/गट-ड वर्गातील कर्मचारी), 5) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, 6) निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थ श्रेणी/गट-ड वर्गातील कर्मचारी...

तहसिलदार आयुब तांबोळी आणि पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची केली पाहणी

Image
अलिबाग, दि.27 (जिमाका): - खालापूर तालुक्यातील अतिदूर्गम भागात असलेल्या दरडग्रस्त भागाची खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते व इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. दरवर्षी खालापूरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून यावर्षी पाऊस पडण्यापूर्वी दरडग्रस्त भाग ताडवाडी (बोरगाव खुर्द) या भागाची पाहणी करून तहसिलदार आयुब तांबोळी व इतर अधिकाऱ्यांनी पोखरवाडी येथील बंधाऱ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा केली, तर आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी जागा प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर उपलब्ध होणाऱ्या सोयींबाबत चर्चा केली. यावेळी खालापूरचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, वावर्ले तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 00000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 30 मे रोजी साधणार अनाथ बालकांशी ऑनलाईन संवाद

Image
    अलिबाग, दि.27 (जिमाका): - प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत दि.30 मे 2022 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील अनाथ बालकांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील 26 अनाथ बालकांना स्नेह प्रमाणपत्र व प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे पत्र देण्यात येणार असून विविध लाभांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत अनाथ बालकांसाठी विविध लाभ देण्यात येतात. या अंतर्गत प्रधानमंत्री श्री.मोदी हे सोमवार, दि.30 मे 2022 रोजी देशभरातील अनाथ बालकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हर्च्युअल पद्धतीने) संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील 26 अनाथ बालके जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होणार आहेत. या बालकांना प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक आदींचे वितरण करण्यात येणार आहे. 00000

जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, गरीब कल्याण अन्न योजना, “एक देश एक रेशनकार्ड” योजनांची यशस्वी अंमलबजावणी

अलिबाग, दि.27 (जिमाका): - केंद्र शासनामार्फत सुरु असलेल्या योजनांबाबत पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी हे मंगळवार, दि.31 मे 2022 रोजी लाभार्थ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, एक देश एक रेशनकार्ड योजना, या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील सदस्यांना मोफत गॅस जोडणी देण्यात येते. त्यामुळे लाकूडतोड कमी होवून पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होईल. तसेच धूराचे प्रमाण कमी झाल्याने महिलांचे आरोग्य सुधारेल. या योजनेमध्ये आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातील 62 हजार 801 लाभार्थ्यांना मोफत गॅस जोडणी पुरविण्यात आलेली आहे. तसेच मार्च 2022 अखेर रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 570 इष्टांक होता. रायगड जिल्हयात एकूण 1 हजार 790 नवीन गॅस जोडणी देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यात 114% गॅस कनेक्शन पूर्ण झाले आह...

प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी

Image
अलिबाग, दि.27 (जिमाका): - रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्यात योजनेच्या अनुदानातून 7 हजार 333 लाभार्थ्यांनी घरकुले बांधली असून, आणखी 2 हजार 480 घरकुले बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश घुले यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयामार्फत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना, रमाई आवास योजना व आदिम जमाती घरकुल योजना या घरकुल योजना राबविण्यात येतात. यामधील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमीहीन किंवा कच्चे घरात वास्तव्य करणाऱ्या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो. 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्याला 9 हजार 813 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामधील 9 हजार 675 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 7 हजार 333 घरकुले ब...