Posts

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी घेतली जांभूळपाडा कातकरीवाडीमधील मयत राम कातकरी यांच्या कुटुंबियांची भेट

आदिवासी विकास विभागाकडून तातडीने केली जाणार 50 हजार रुपयांची मदत   अलिबाग, दि.13 (जिमाका):-  उरण तालुक्यातील जांभूळपाडा कातकरीवाडी येथे मंगळवार, दि.12 जुलै 2022 रोजी झोपडी कोसळून राम महादू कातकरी या आदिवासी बांधवाचे निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नीलाही दुखापत झाली. या घटनेची माहिती आशा वर्कर सौ.नाईक आणि सुनील नाईक यांनी फोन करून प्रा.राजेंद्र मढवी यांना कळविली. या घटनेची खात्री करून प्रा.राजेंद्र मढवी यांनी जिल्हा आणि तालुकास्तरीय प्रशासनाला सविस्तर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसिलदार आणि त्यांची टीम तातडीने तिथे पोहोचली. आपत्ती व्यवस्थापन विभागात काम केलेले दत्ता गोंधळी आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी देखील घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबाला धीर दिला. याचबरोबर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विकास अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनीही घटनास्थळी तातडीने भेट दिली. त्यांनी मयत राम कातकरी यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून पिडीत कुटुंबाला आदिवासी विभागाकडून 50 हजार रुपयांची तात्काळ मदत करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी महसूल, पोलीस प...

यंत्राद्वारे भात लावणीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

Image
  भातशेतीमध्ये यांत्रिकी पद्धतीचा उपयोग वाढविण्याचे  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्जवला बाणखेले यांचे आवाहन अलिबाग, दि.12 (जिमाका):-  भातशेतीतील मजूरांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून यावर मात करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. येत्या कालावधीत यामध्ये वाढ करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला असून त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. म्हणून या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेवून भातशेतीमध्ये यांत्रिकी पद्धतीचा उपयोग वाढवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्जवला बाणखेले यांनी केले आहे. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्यातील सर्व च  तालुक्यात  भातशेतीसाठी  मजूर मिळणे  दिवसेंदिवस  कठीण  होत आहे.  यामुळे शेती परवडत नाही, अशी अडचण शेतकरी व्यक्त करीत असतात. त्यामुळे बळीराजाच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या वतीने रायगड जिल्हातील  खालापूर व रोहा येथील शेतकरी व शेतकरी गटांना  यंत्राच्या स...

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 करिताचा आरक्षण सोडत तसेच मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्थगित

Image
  अलिबाग, दि.12 (जिमाका):-  अतिवृष्टीमुळे होणारे नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कोकण, जिल्हाधिकारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. यानुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत. 00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत रोपवाटिका उभारणी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Image
अलिबाग, दि.12 (जिमाका):-  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास असलेला वाव पाहता या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात सन 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये 15 तालुक्यांमध्ये एकूण 17 शेतकऱ्यांच्या भाजीपाला रोपवाटिकेची उभारणी झाली आहे. त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 15 व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2 रोपवाटिका उभारण्यात आल्या आहेत. हवामान बदलाचा विचार करता भविष्यात तयार रोपे, कलमे यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकाचे व्यावसायीक पध्दतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते. तसेच त्याचे निर्यातही मोठया प्रमाणात करण्यात येते. मागील 2 ते 3 व...

खैरे धरण पूर्णत: सुरक्षित; कोलाड पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी केले स्पष्ट

Image
अलिबाग, दि.12 (जिमाका):-   महाड तालुक्यातील मौजे वलंग ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.विचारे यांच्यासमवेत रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत पाटबंधारे उपविभाग कोलाड उपविभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.चितळकर व संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी श्री.मस्के यांनी दि.08 जुलै 2022 रोजी धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सरपंचांनी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले असता त्यांना संबंधित धरणाचे झालेले काम व सुरक्षिततेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. धरण पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही, असे रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत पाटबंधारे उपविभाग कोलाडच्या उप कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी धरणापासून खाली असलेल्या गावांना (खैरे, वलंग, रोहन, जुईनगर) कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही. तसेच पावसाळ्यात धरण सुरक्षिततेबाबत रायगड पाटबंधारे कोलाड उपविभागाकडून दररोज धरण क्षेत्रात जाऊन विशेषतः धरण गळती थांबविण्याचे काम केलेल्या ठिकाणांची पाहणी व देखरेख करण्यात येत आहे, असेही कळविले आहे. या धरण क्षेत्राची मौजे वलंग, सोनघर, खैरे या ग्रामपंच...

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत

Image
अलिबाग, दि.12 (जिमाका):-  केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून देशभरात सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या निकषांत बदल करून लाभार्थ्यांसाठी अनेक अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत.  “ एक जिल्हा एक उत्पादन ”  संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याला एक उत्पादन ठरवून दिले होते त्या क्षेत्रातच नवा उद्योग सुरु करायचे बंधन आता शिथिल करण्यात आले आहे. हा बदल जिल्ह्यातील तरुण, तरुणी, बेरोजगार, महिला बचतगट आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.   “ एक जिल्हा एक उत्पादन ”  या संकल्पनेनुसार रायगड जिल्ह्याला  “ मत्स्य आणि मत्स्य प्रक्रिया ”  या उद्योगांना प्राधान्य होते आणि नवीन व्यवसाय करणाऱ्यांना बंधनकारक होते. त्यामुळे नवीन उद्योग सुरु करण्यास काही प्रमाणात अडथळे येत होते. हा अडथळा आता अट शिथिल झाल्याने दूर झाला आहे. आता एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेला योजनेत प्राधान्य जरूर असेल पण इतर उद्य...

स्वच्छता पंधरवडा निमित्ताने गेल इंडिया कंपनी, उसरच्या माध्यमातून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून जनजागृती

Image
अलिबाग, दि.11 (जिमाका):-  दि.01 ते 15 जुलै 2022 दरम्यान चालू असलेल्या  “ स्वच्छता पंधरवडा ”  निमित्ताने गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून गेल इंडिया लिमिटेड, उसर येथे  “ मेरा भारत, स्वच्छ भारत ”  या पथनाट्यातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने स्वच्छता, प्लास्टिक बंदी तसेच कोविड लसीकरण यांसह विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता गेल इंडिया कंपनी, उसरचे मुख्य महाप्रबंधक व प्रभारी अधिकारी अनुप गुप्ता, मुख्य महाप्रबंधक, नवी दिल्ली एस.सी. रे, महाप्रबंधक वीरेंद्र कुमार, महाप्रबंधक कासिवेलराजन, महाप्रबंधक जितिन सक्सेना, उप महाप्रबंधक अतुल दलाल, मुख्य प्रबंधक एलविना आईजक, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबागच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी तसेच गेल इंडिया लिमिटेड व इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ऊसर येथील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच सर्व कॉन्ट्रॅक्ट मधील कामगार उपस्थित होते. या पथनाट्यात विनोद नाईक, विजय शिंदे, सुचित जावरे, प्रसाद अमृते, श्रेया पाटील, म...