जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 करिताचा आरक्षण सोडत तसेच मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्थगित

 


अलिबाग, दि.12 (जिमाका):- अतिवृष्टीमुळे होणारे नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कोकण, जिल्हाधिकारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती.

यानुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन